पुढील ५ दिवस राज्यात ऊन-पावसाचा खेळ

पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडेल तर विदर्भातील गोंदिया, वर्धा आणि चंद्रपुर या जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
पुढील ५ दिवस राज्यात ऊन-पावसाचा खेळ
Rain And Heat WaveAgrowon

राज्यात पुढील ५ दिवसांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची (Rain) शक्यता असून काही भागांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave येण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीटवरुन दिली आहे.

पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडेल तर विदर्भातील गोंदिया, वर्धा आणि चंद्रपुर या जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

दरम्यान, मॉन्सून अजून राज्यात पोहोचलेला नसून हा पूर्वमोसमी पाऊस आहे. यंदा मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (ता. ३१) जाहीर केला होता.

शेतीसाठी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जिरायती भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक (१०६) टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात यंदा दमदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com