बारामती तालुक्यात २६२ घरकुलांचे काम पूर्ण

जिल्ह्यात सर्वाधिक २६२ घरकुलांचे काम बारामती तालुक्यात झाले. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेची १८८ आणि रमाई आवास योजनेची ७४ घरकुले आहेत.
MahaAavas
MahaAavasAgrowon

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती विकास गटात १५ मार्चपासून राबविण्यात आलेल्या ‘महाआवास’ विशेष मोहिमेत २६२ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. या विशेष मोहिमेचा समारोप ३१ मे रोजी ‘एक दिवस घरकुल लाभार्थींसाठी’ या अभियानाद्वारे करण्यात आला.

पंचायत समिती बारामतीच्या २५ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ३१ मे रोजी प्रत्यक्ष भेटी देऊन लाभार्थी मेळावे घेतले. विशेष मोहिमेच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक २६२ घरकुलांचे काम बारामती तालुक्यात झाले. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेची १८८ आणि रमाई आवास योजनेची ७४ घरकुले आहेत.

बारामती तालुक्यात आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ हजार ६६१ इतकी घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी ३ हजार ४५३ घरकुलांचे काम पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. ९२५ भूमिहीन लाभार्थ्यांपैकी २४८ जणांना जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तालुक्यात ७३ टक्के घरकुल उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.

संपूर्ण अभियानात एकूण १२७५ लाभार्थ्यांच्या भेटी घेतल्या. तर ७५ मेळावे घेण्यात आले. या कालावधीत ६०० लाभार्थ्यांची नवी प्रकरणे मंजूर करण्यात आली. ही कामेदेखील लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामस्तरावरील प्रत्येक कर्मचाऱ्याने विशेष प्रयत्न केल्याने गरजूंना हक्काचे घर देता आले.

- डॉ. अनिल बागल, गट विकास अधिकारी, बारामती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com