Food Technology : अन्नतंत्र महाविद्यालयात ‘इनक्युबेशन सेंटर’चे काम सुरू

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये कॉमन इनक्युबेशन सेंटर (सामाईक पायाभूत सुविधा केंद्र) उभारणीसाठी ३ कोटी २९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
Food Processing
Food Processing Agrowon

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Vasantrao Naik Agriculture University) अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये (College Of Food Technology) कॉमन इनक्युबेशन सेंटर (Common Incubation Center) (सामाईक पायाभूत सुविधा केंद्र) उभारणीसाठी ३ कोटी २९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांच्या हस्ते बुधवारी (ता.१०) या केंद्राच्या कामास सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (पीएमएफएमई) नवउद्योजक शेतकरी, लघु उद्योजकांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी हे केंद्र कार्यरत राहील.

Food Processing
Food Processing : प्रक्रियाच तारेल शेतीला

कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, समुदाय विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, प्रा. दिलीप मोरे, प्रा. हेमंत देशपांडे, डॉ. के. एस. गाडे, डॉ. व्ही. एस. पवार, डॉ. भारत आगरकर, अन्नतंत्र अभ्यास मंडलाचे सदस्य उद्योजक नरेश शिंदे, नंदकिशोर भारती आदी उपस्थित होते.

Food Processing
Food Processing: प्रक्रिया उद्योगासाठी अर्ज करण्याचे आवाहन

या केंद्रांतर्गत नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला स्वयंसहाय्यता गट, प्रक्रिया उद्योजक यांना गूळ, गूळ पावडर, गूळ वड्या (क्युब), काकवी निर्मिती, ऊस रसापासून पेय बनविणे, बॉटलिंग, मसाले प्रक्रिया उद्योगाअंतर्गत हळद पावडर, मिरची पावडर तसेच विविध प्रकारचे मसाले निर्मिती उद्योगांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येईल. व्यापारी तत्त्वांवर सोयीसुविधा पुरविण्यात येतील. प्रक्रिया उद्योजकांना या केंद्रांतील यंत्र सामग्री भाडे तत्त्वावर वापरण्यास देण्यात येईल.

या केंद्रासाठी एकूण ३ कोटी २९ लाख रुपये निधी मंजूर आहे. त्यात गूळ प्रक्रिया उद्योगासाठी १ कोटी रुपये, ऊस रस पेय निर्मितीसाठी ४५ लाख रुपये, मसाले प्रक्रिया उद्योगासाठी ५५ लाख रुपये, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेसाठी २५ लाख रुपये निधीची तरतूद आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी १ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. गूळनिर्मितीसाठी प्रतिदिन १० टन ऊस गाळप करणारी यंत्रसामग्री बसविण्यात येईल.

या केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य डॉ. उदय खोडके, तर मुख्य समन्वयक डॉ. राजेश क्षीरसागर आहेत. या अंतर्गत राज्य नोडल एजन्सी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र आहे. या वेळी डॉ. क्षीरसागर यांनी सादरीकरणाव्दारे केंद्राच्या उद्दिष्टांची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com