पालखी सोहळ्याची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होणार

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे.
पालखी सोहळ्याची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होणार
Palkhi SohalaAgrowon

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. त्यासंबंधीची कामे अंतिम टप्प्यात आहे. पालखी तळ व इतर आनुषंगिक सुविधांची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मौजे उरळी देवाची येथील साईड पट्टयांची कामे, वडकीनाला येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणी असलेल्या चरांची दुरुस्ती, लोणी काळभोर येथील मोऱ्यांची दुरुस्ती, बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील सेवा रस्त्याचीची दुरुस्ती, दौंड ते नीरा रस्त्याच्या साइड पट्ट्यांची दुरुस्ती ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कऱ्हा नदीवरील पुलाची दुरुस्ती, इंदापूर तालुक्यातील आंथुर्णे आणि सणसर येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सपाटीकरण व रस्ता करण्यात येत आहे. सासवड नगरपालिकेतर्फे पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणांशी संबंधित कामे वेगाने करण्यात येत आहेत.

जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद आणि दोन्ही महानगरपालिकांतर्फे महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक सुविधांसह स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा दिली जाईल. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येतील. आषाढी वारीसाठी ३७ विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती असेल. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरती वैद्यकीय पथके आणि १०८ रुग्णवाहिकांद्वारे आरोग्य सुविधा देण्यात येतील.

परिवहन विभागातर्फे पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षाविषयक तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील. पालखी मार्गावरील रुग्णालयांतील १० टक्के खाटा आरक्षित राहतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com