Agriculture Department : खेडमधील कृषी खात्याचे काम असमाधानकारक

खेड कृषी विभागाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण योजनेतून निवड झालेल्या शेतकरी लाभार्थीना अनुदानित ट्रॅक्टर व विविध कृषी अवजारांचे वाटप आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

राजगुरूनगर : ‘‘खेड तालुक्यातील कृषी खात्याचे (Agriculture Department) काम असमाधानकारक असून, शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा (Government Scheme) लाभ सहजपणे दिला जात नाही.’’ अशी टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.

Agriculture Department
Agriculture : शिक्षकीपेशाबरोबरीने जोपासली शेती...

खेड कृषी विभागाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण योजनेतून निवड झालेल्या शेतकरी लाभार्थीना अनुदानित ट्रॅक्टर व विविध कृषी अवजारांचे वाटप आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निर्मला पानसरे, अरुण चांभारे, कैलास सांडभोर, नवनाथ होले, चंद्रकांत इंगवले, विनायक घुमटकर, अरुण चौधरी, सुरेश शिंदे, अंकुश राक्षे, सागर सातकर, जयसिंग दरेकर उपस्थित होते.

मोहिते म्हणाले, ‘‘पीकविमा, कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. कृषी खात्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्याला काय फायदा होणार, ते कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे. तो लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विविध योजनांचे लाभ त्यांना निःसंकोचपणे मिळाले पाहिजेत, पण तालुक्यात तसे होत नाही. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com