राष्ट्रगीताने कामाला सुरुवात

या जिल्ह्यात एक गाव असेही आहे जिथे सकाळचा सूर्य देशभक्तीचा मंत्र घेऊन उगवतो. कारण या गावातील लोकांच्या दिवसाची सुरुवातच राष्ट्रगीताने होते. गडचिरोली पोलिस आणि प्रशासनाच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम मुलचेरा येथे दररोज सुरू आहे.
Gadchiroli
Gadchiroli Agrowon

गडचिरोली : एकीकडे गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District)नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी या जिल्ह्यात एक गाव असेही आहे जिथे सकाळचा सूर्य देशभक्तीचा मंत्र घेऊन उगवतो. कारण या गावातील लोकांच्या दिवसाची सुरुवातच राष्ट्रगीताने (Gadchiroli National Anthem) होते. गडचिरोली पोलिस (Gadchiroli Police) आणि प्रशासनाच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम मुलचेरा येथे दररोज सुरू आहे.

Gadchiroli
GM Soybean : ‘जीएम’चा मार्ग करा मोकळा

राष्ट्रगीत सुरू होण्याआधी एखादे देशभक्तीपर गाणे वाजवून मुलचेरा गावात या कार्यक्रमाची सुरुवात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या काही सेकंद आधी देशभक्तीपर गीत वाजते. घड्याळाचा काटा ८ वाजून ४५ मिनिटांवर येताच ‘परेड सावधान... एक साथ राष्ट्रगीत सुरू कर’ अशी घोषणा होते. हा आवाज मुलचेरामध्ये जिथपर्यंत पोहोचतो तेथील गावकरी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगान सुरू करतात.

Gadchiroli
Guava Cake : पेरूपासून बनवलाय पुण्यातल्या कयानी बेकरीनं केक! | ॲग्रोवन

या वेळी आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या वाहनांनादेखील आपसूक ब्रेक लागून वाहनचालकही उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी होतात. राष्ट्रगीत संपले की सगळे ‘भारत माता की जय’ असा जयघोष करतात आणि त्यानंतर देशाप्रती आपली भावना व्यक्त करून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दुकानदार आपले दुकान उघडतात आणि बाजारपेठा सुरू होतात.

मुलचेरा पोलिस स्टेशन येथे काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले ठाणेदार अशोक भापकर यांनी १५ ऑगस्ट २०२२ पासून या उपक्रमाला सुरुवात केली आहे. १५ ऑगस्टपूर्वीच त्यांनी याविषयी व्यापारी वर्ग, युवा पिढी, तसेच पत्रकार बांधवांसोबत सविस्तर चर्चा करून या उपक्रमाचे नियोजन केले.

रोज सकाळी राष्ट्रगीत गायनाने जनतेमध्ये देशभक्ती वाढेल आणि समाजातही एकोपा निर्माण होईल या उद्देशाने सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले. एखाद्या शाळेच्या किंवा हायस्कूलच्या परिपाठाप्रमाणे मुलचेरा गावाने हा उपक्रम १५ आगस्ट २०२२ पासून अखंड सुरू ठेवला आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून गावात भांडण तंटे कमी होऊन एकोपा वाढला आहे. तसेच गावातील लोकांची काम करण्याची क्षमता आणि उत्साह यामध्येसुद्धा लक्षणीय बदल झाला आहे.

महाराष्ट्रातील हे दुसरे गाव...

मुलचेरा गाव तालुका मुख्यालय असून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत समाविष्ट आहे. हे महाराष्ट्रातील असे दुसऱ्या क्रमांकाचे गाव आहे, जिथे राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात होते. या आधी सांगली जिल्ह्यातील भिलवडी आणि तेलंगणा राज्यातील नालगोंडा या गावांत या प्रकारे राष्ट्रगीत गायनाने दिवसाची सुरुवात होत आहे. आता हा सन्मान गडचिरोलीकरांना मिळाला असून या उपक्रमामुळे मुलचेराची लोकप्रियता वाढत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com