Agriculture Department : कृषी अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन

हिंगोलीतील घटनेच्या निषेधार्थ वरिष्ठांना दिले निवेदन; कठोर कारवाईची मागणी
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

अकोला : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना वापरलेल्या अपशब्दांचा निषेध करीत सोमवारी (ता. १७) महाराष्ट्र कृषिसेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने राज्यभर काम बंद आंदोलन केले.

Agriculture Department
Banana Crop Insurance : केळी उत्पादकांना भरपाईची प्रतीक्षा

या बाबत संघटनेने राज्याच्या कृषी सचिव व वरिष्ठांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, शेतकऱ्यांच्या सेवार्थचा ध्यास घेऊन कृषी विभागातील वर्ग १ संघटनेमधील सर्व अधिकारी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटत आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना अपमानित करणे व त्यांची मानहानी करण्याच्या घटनेत वाढ होत आहे, अशीच एक घटना ता. १३ ऑक्टोबर रोजी घडली.

Agriculture Department
Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या मदतीतून चांदुररेल्वे मंडल वगळले

आमदार बांगर यांनी हिंगोली येथे पंत प्रधान पीकविमा योजनेच्या चर्चेदरम्यान त्या ठिकाणी उपस्थित सर्व जनतेसमोर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना कानाखाली मारण्याची भाषा करून अपशब्द वापरले. घडलेली घटना ही अतिशय अयोग्य असून त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात कर्तव्य बजावत असताना असुरक्षेची भावना निर्माण होऊन त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाला आहे.

महाराष्ट्र कृषिसेवा राजपत्रित अधिकारी संघटना हिंगोली येथे झालेल्या घटनेचा निषेध करीत आहे व आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काम बंद ठेवले. राजपत्रित अधिकारी संघटनेच्या भावना आपण शासनाला कळवाव्यात व अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

तसेच कर्तव्यावर असणाऱ्या प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांचे कोणीही अपमान केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना शासन स्तरावरून निर्गमित कराव्यात, अशी मागणी संघटनेने केल्याची माहिती अध्यक्ष आरिफ शाह यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com