Agricultural Laborers : भात कापणीसाठी कामगार मिळेना

घरात दिवाळीची गडबड सुरू आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भात कापणी करणे गरजेचे आहे; परंतु भात कापणीसाठी कामगार मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
Paddy Harvesting
Paddy HarvestingAgrowon

चिपळूण, जि. रत्नागिरी ः घरात दिवाळीची गडबड सुरू आहे. परतीच्या पावसाने (Heavy Rainfall) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भात कापणी करणे गरजेचे आहे; परंतु भात कापणीसाठी (Paddy Harvesting) कामगार मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. ग्रामीण भागातील तरुण आणि शेतमजूर कंपन्यांमध्ये काम करत आहेत. परिणामी, भात कापण्यास मजुरांची कमतरता भासत आहे. जे कामगार उपलब्ध आहेत त्यांचा भाव वधारला आहे.

रब्बी हंगामात घेतले जाणारे दुबार भातपीक, कडधान्य शेती, भाजीपाला लागवडीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मेहनत अधिक, त्या तुलनेत उत्पादन कमी मिळत असल्याने तरुण शेतीऐवजी कंपन्यांमध्ये रोजगार शोधत आहेत. त्यामुळे हजारो एकर शेती पडीक झाली असून त्याचा फटका शेती उत्पादनाला बसतो आहे.

Paddy Harvesting
Crop Damage Compensation : कळंब तालुक्यात ४८ गावांत मदतवाटप रखडले

यापूर्वी भातशेती कापण्यासाठी तालुक्यातील डोंगराळ भागातील आदिवासी समाजातील मजूर मोठ्या संख्येने मिळायचे; मात्र हाच कामगार खेर्डी, खडपोली, लोटे एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करू लागले आहेत. तरुण वर्गाची नोकरीला अधिक पसंती मिळू लागल्याने तो शेतीपासून दुरावत आहे.

Paddy Harvesting
Sugarcane Labor : मजुरांची दिवाळी उसाच्या फडात

त्यामुळे परंपरागत शेती सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्याच घरातील मंडळींना घेऊन शेतावर काबाडकष्ट करावे लागतात. भात कापणीसाठी ५०० ते ६०० रुपये मजुरी देऊनही शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भातशेतीची कामे केली नाहीत तर कापणीला आलेल्या पिकाची नासाडी होण्याची परिणामी उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने मजुरांची मनधरणी करून मागेल ती मजुरी, शिवाय नाश्ता, जेवणाची सोय, येण्या-जाण्याचा खर्च द्यावा लागतो.

कापलेले भात खराब होऊ नये म्हणून तत्काळ झोडणी करावी लागते; मात्र सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने कापणीला विलंब होत आहे. घरातील माणसे शेतीच्या कामात गुंतली तर दिवाळीच्या तयारीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे.सध्या कापणीला मजूर मिळत नसल्याने फार पंचाईत होत आहे. एकीकडे भातशेती करणे आता खूप महागात पडत असून मजुरांना ५०० ते ६०० रुपये देऊन सकाळी नाश्ता, दुपारी जेवण यासह त्यांना ने-आण करण्यासाठी गाडीभाडे द्यावे लागते. त्यामुळे शेती न परवडण्यासारखी झाली आहे. बहुतांशी लोक नोकरदार असल्याने आता मजूर मिळणे कठीण झाले आहे.

- महेंद्र शिंदे, शेतकरी, पेढांबे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com