Nashik News: पेठ तालुक्यात कार्यशाळा

पेठ तालुक्यातील मुख्य पीक भात असून येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. सुधारित बियांण्याचा अभाव आहे.
Agriculture Workshop Nashik News
Agriculture Workshop Nashik NewsAgrowon

Nashik News : आदिवासी भागात स्थानिक रोजगार (Employment) नसल्यामुळे बारमाही अल्पभूधारक शेतकऱ्यांसह शेतमजूर उपजीविकेसाठी शहरांकडे स्थलांतरित होतात. येथील शेती (Agricultural) पावसावर अवलंबून असल्याने ती बेभरोशाची होते.

परिणामी कर्तापुरुष रोजगारासाठी बाहेर गेल्यास घरातील महिलांनी शेतीकडे (Women Farmer) वळून शेती कसदार, सुपीक व जास्त उत्पादन (Agriculture Production) पिकून येण्यासाठी जमिनाचा पोत खतांची (Fertilizer) मात्रा याबरोबरच नवीन तंत्रज्ञानाची माहिती उभी धोंड (ता. पेठ) येथे महिला शेतकरी शेती कार्यशाळेत (Agriculture Workshop) देण्यात आली.

पेठ तालुक्यातील मुख्य पीक भात असून येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. सुधारित बियांण्याचा अभाव आहे.

पारंपरिक रोपवाटिकाचे अवलब करणे, कीटकनाशकाचा अतिरेक वापर, भूसरंक्षक सेंद्रिय खतांचा वापर न करणे, अतिरेक पाणीवापरामुळे जमीन पाणवळ चोपन होण्याचे प्रमाण वाढत आहे.

माती परीक्षणानुसार फक्त नत्र, स्फुरद, पालाश याचा विचार करून सूक्ष्म मूलद्रव्ये, सेंद्रिय खते यांचा वापर केला जात नाही.

त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत जाऊन शत्रू किडीची वाढ व मित्र किडीचा विनाश होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो.

Agriculture Workshop Nashik News
Integrated Farming : एकात्मिक शेतीपद्धती प्रकल्पावर कार्यशाळा

त्यामुळे कृषी विभागाच्या पेठ तालुका कृषी विभागाने गाव पातळीवर प्रमुख पिकांच्या शेतीशाळेचे आयोजन करून महिला शेतकरी व शेतकऱ्यांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाची जनजागृती करून आर्थिक जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केला.

आदिवासी भागातील शेती चढ-उताराची असून, नगदी पिके व अधुनिक शेतीबाबत महिला शेतकऱ्यांची भावना व त्यांना शेतीविषयक माहिती जाणून घेण्याची इच्छा हे कार्यशाळेचे उद्दिष्ट सफल होत असून, येणाऱ्या काळात तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम होईल.
अविनाश खैरनार, तालुका कृषी अधिकारी
पारंपरिक कष्टाच्या शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देऊन पतीच्या खांद्याला खांदा लावून अधुनिक शेती कसण्याची जादू कार्यशाळेत मिळाली असून, आर्थिक स्थिती सुधारण्याचे बळ मिळाले. चांगल्या बियाण्यांची निवड करून सेंद्रिय खताचा वापर करून निरोगी पीक व निरोगी स्वास्‍थ्य राखण्याची जबाबदारी आमची आहे.
वेणूबाई गवळी, शेतकरी, उभीधोंड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com