
अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत (PDKV) मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाद्वारे ३४ वर्षांपासून ज्वारी (Jowar) आणि गहू पीक (Wheat) पद्धतीवर आधारित दीर्घ मुदतीय खतांचा (Fertilizer) वापर व जमिनीचे आरोग्य तथा पिकांची उत्पादकता विषयक ‘अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प’ कार्यरत आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन आज (ता.१७) कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली केले जाणार आहे. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
कार्यशाळेमध्ये देशातील १८ विविध ठिकाणी सुरू असलेले दीर्घ मुदतीय खत प्रयोगांवर आधारित निष्कर्ष चर्चिले जाणार आहेत. कार्यशाळेस भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे (भोपाळ) माजी संचालक डॉ. ए. के. पात्रा, भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे कार्यवाहू संचालक डॉ. ए. बी. सिंग, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे यांची सुद्धा उपस्थिती राहील.
मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एम. भोयर, दीर्घ डॉ. आर. एच. वंजारी, प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. डी .जाधव, डॉ. बी. ए. सोनुने व इतर पुढाकार घेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.