Agriculture Export : ‘कृषी माल निर्यात संधी’वरील कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

आत्मा प्रकल्प संचालकांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आली होती.
Export
ExportAgrowon

अकोला ः येथील आत्माच्या कार्यालयात ‘कृषिमाल निर्यात संधी’ (Agriculture Export) विषयावर एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी नागपूर येथील निर्यातदार प्रवीण वानखडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

आत्मा प्रकल्प संचालकांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत श्री. वानखडे यांनी आपल्याकडील शेती माल निर्यातीतील किती संधी आहेत, कुठला माल निर्यात होऊ शकतो, यासाठी पीक उत्पादन करताना काय काळजी घेतली पाहिजे अशा विविध मूलभूत बाबींसह निर्यातीच्या अनुषंगाने शेतकरी कंपन्यांना किती संधी आहे, हे सविस्तरपणे सांगितले.

Export
Fruit Export Registration : पेरू-सीताफळ-ड्रॅगन फ्रूट निर्यातीसाठी नोंदणीची सुविधा

कार्यशाळेला अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोला या तालुक्यांतील ४५ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी, उद्योजकांची उपस्थिती होती. शेतकरी प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचे समाधान करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com