Agriculture Sanjeevani Project : वर्ल्ड बँक प्रतिनिधींचा शेतकऱ्यांशी संवाद

जिल्ह्यात पोकरा प्रकल्पांतर्गत योजनांच्या परिणामाची माहिती जाणून घेताना वर्ल्ड बँकेचे प्रतिनिधी व पोकराचे अधिकारी.
Agriculture Sanjeevani Project
Agriculture Sanjeevani Project Agrowon

औरंगाबाद : जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, अर्थात पोकराच्या (POCRA Project) विविध योजनांच्या (Agriculture Scheme) परिणामांची माहिती जाणून घेण्यासाठी जागतिक बँकेच्या (World Bank) प्रतिनिधींसह पोकराच्या प्रकल्प संचालकांनी गुरुवारी (ता. 3) थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

कन्नड तालुक्यातील रुईखेड व टापरगाव तसेच खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव आदी ठिकाणी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. शेडनेटमधील ढोबळी मिरची, शून्य मशागत तंत्रज्ञानावरची शेती, शेततळे, शेतकरी उत्पादक कंपनीच्या कामाची माहिती जाणून घेतली. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पोकरा प्रकल्पाच्या परिणामांची माहिती घेऊन येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या.

पोकरा प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या साधनांसोबत वैयक्तिक शेतकऱ्यांना मिळतील अशी साधने देण्याची सोय करावी, पाइपलाइन, विहिरी आदी शेतीसाठी आवश्यक बाबी शेतकऱ्यांना मिळतील अशी व्यवस्था करावी, पाण्याशिवाय शेती शक्य नाही त्यामुळे सिंचन वाढीचे उपाय बांधापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने प्रकल्पाचे नियोजन करावे, समूहाने प्रकल्पातील योजनांचा लाभ देणे ऐवजी शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळण्याचे नियोजन करावे

Agriculture Sanjeevani Project
What Rate : देशातील गव्हाचा साठा निचांकी पातळीवर| Agrowon | ॲग्रोवन

अशी मागणीही शेतकऱ्यांनी केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, जागतिक बँकेचे परमेश शहा, जागतिक बँकेचे प्रमुख शेती विशेषज्ञ ॲड्रीव गुडलँड, जागतिक बँकेचे शेतीविशेषण रंजन समंतराय, सौम्य श्रीवास्तव, विकास कांगो, पोकराचे कृषी विद्यापीठ विजय कोळेकर यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एस. तौर, कन्नड व खुलताबादचे तालुका कृषी अधिकारी आदींची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com