Millet Conference : पुण्यात १६ डिसेंबरला जागतिक भरडधान्य परिषद

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या ‘जागतिक भरड धान्य वर्ष’ उपक्रमाचे औचित्य साधून येत्या १६ डिसेंबर रोजी पुण्यात जागतिक भरडधान्य परिषद (वर्ल्ड मिलेट समिट) होत आहे.
Millet
MilletAgrowon

पुणे ः संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या ‘जागतिक भरड धान्य वर्ष’ (Millet Year) उपक्रमाचे औचित्य साधून येत्या १६ डिसेंबर रोजी पुण्यात जागतिक भरडधान्य परिषद (Millet Conference) (वर्ल्ड मिलेट समिट) होत आहे. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज ॲन्ड ॲग्रिकल्चर’ने (एमसीसीआयए) आयोजित केलेल्या या परिषदेत नाबार्ड व केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयदेखील सहभागी झाले आहे.

Millet
Pearl Millet : आरोग्यदायी बाजरीचे फायदे काय आहेत?

‘नव्या भविष्यासाठी प्राचीन धान्य’ असे घोषवाक्य असलेल्या या परिषदेच्या आयोजनामुळे भरडधान्य धोरणाला प्रोत्साहन मिळेल. उच्च पोषणमूल्यांमुळे मानवी आरोग्यासाठी बहुमोल ठरणाऱ्या भरड धान्याची बाजारपेठ विस्तारण्यास खूप वाव आहे.

केंद्र शासनानेच आता भरड धान्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे देशभर भरड धान्याखालील लागवड, प्रक्रिया, विपणन आणि निर्यातीलादेखील प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान व अर्थकारण उंचावण्यास मदत होईल.

Millet
Millet Processing : भरडधान्यांचे प्रक्रियामूल्य वाढवा...

संयुक्त राष्ट्रसंघ व त्याअंतर्गत अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) २०२३ हे वर्ष ‘जागतिक भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले. मात्र, त्यासाठी पहिला प्रस्ताव भारतानेच मांडला होता. पुण्याच्या सेनापती बापट मार्गावरील मराठा चेंबरच्या बजाज गॅलरीत सकाळी ९.३० ते ६.३० या वाजेदरम्यान ही परिषद होईल. परिषदेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी चेंबरचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबाने, चेंबरच्या अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष आनंद चोरडिया प्रयत्नशील आहेत.

जागतिक भरडधान्य परिषदेच्या निमित्ताने देशातील नामांकित शास्त्रज्ञ, अभ्यासक व उच्चपदस्थ व्यक्तींचे विचार ऐकण्याची संधी मिळेल. भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. बी. दयाकर राव, नीती आयोगाच्या भरड धान्य कृती दलाचे सदस्य डॉ. बी. भंडारी, अन्न तंत्र संशोधन व पोषण केंद्राच्या संचालिका डॉ. श्रीदेवी सिंह, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक प्रा. डॉ. तनुजा नेसारी या परिषदेत विचार मांडतील.

राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता व व्यवस्थापन संस्थेच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. कोमल चौहान, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे कृषी विपणन उपसल्लागार डॉ. जितेंद्र डोंगरे, प्रादेशिक पारपत्र विभागातील मुत्सद्दी डॉ. अर्जुन देवरे, पाकशास्त्रसंबंधी संघटनांच्या राष्ट्रीय महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनजित गिल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील नागरी सेवा सल्लागार अपराजिता सिंहदेखील भरड धान्यावर मते व्यक्त करतील. परिषदेची सविस्तर माहिती https://www.mcciapune.com/events/events-detail-page/1336/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com