Soybean Pest : सोयाबीनसह कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव

परतूर, जि. जालना : तालुक्यात कपाशी व सोयाबीन पिकावर अनेक प्रकारच्या अळ्यांनी हल्ला चढवला आहे. यंदा खरिपाच्या सुरुवातीपासून संकटाची मालिका सुरूच आहे.
Soybean Pest
Soybean PestAgrowon

परतूर, जि. जालना : तालुक्यात कपाशी व सोयाबीन पिकावर अनेक प्रकारच्या अळ्यांनी (Worm Outbreak On Soybean And Cotton Crop) हल्ला चढवला आहे. यंदा खरिपाच्या (Kharif Season 2022) सुरुवातीपासून संकटाची मालिका सुरूच आहे. त्यातून सावरलेले पिके जोमात येताच पावसाची दीर्घ उघडीप आणि अळीने चढविलेल्या हल्याने उत्पादन घट होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात बदलत्या हवामानामुळे (Climate Change) पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Soybean Pest
GM Soybean : देशात जनुकीय परावर्तित सोयाबीनची मोठी खेप दाखल

सध्या सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यात अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. परिणामी, फवारणीसाठी शेतकऱ्यांना महागडी औषधी उसनवारी करून खरेदी करावी लागत आहे.तर दुसरीकडे उत्पादनपेक्षा खर्च वाढत असल्याने शेती कशी करावी असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

Soybean Pest
Banana Disease : केळीवरिल कुकुंबर मोझॅक रोगाचं नियंत्रण कस कराल?

वातावरणातील बदलामुळे कापूस पिकात फुले व पातेगळ होत आहे. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादन घटणार आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधी फवारणी करत आहे. तरी देखील पाहिजे तसा फरक जाणवत नसल्याने चिंता वाढली आहे. - शिवाजीराव उबाळे, शेतकरी, परतूर

बदलत्या वातावरणामुळे पिकावर रोग पडला आहे. यामुळे महागड्या औषधानांची फवारणी करावी लागत आहे.- शिवाजी टेकाळे, शेतकरी, ब्राह्मवडगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com