Rain Update : काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा `येलो अलर्ट`

राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप कायम आहे. तर काही ठिकाणी हलक्या श्रावण सरी झाल्या. उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.
Rain Updates
Rain UpdatesAgrowon

पुणेः राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पावसाची (Rain) उघडीप कायम आहे. तर काही ठिकाणी हलक्या श्रावण सरी झाल्या. उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं (Weather Department) काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केलाय.

Rain Updates
Cotton : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल?

कोकणातील काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण काहीसं वाढलं. पालघर जिल्ह्यातील जव्हार, तलासरी, वाडा या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर रायगड जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. पोलादपूर या मंडळात सर्वाधिक ४६ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाड, माथेरान, श्रीवर्धन आणि तळा या मंडळांमध्येही हलक्या पावसानं हजेरी लावली. तसचं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे ८२ मिलिमीचर तर लांजा येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला. हरनाई, चिपळून, खेड, वाकवली या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये हलका पाऊस झाला.

Rain Updates
Heavy Rain : मुसळधार पावसाचा मध्य प्रदेशात कहर

मध्य महाराष्ट्रातील नगर, धुळे, जळगाव, नंदूरबार, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा मंडळात ७० मिलिमीटर पाऊस झाला. तर पन्हाळा आणि राधानगरी मंडळात हलक्या सरी पडल्या. नाशिक जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. इगतपुरी, पेठ, सुरगणा आणि त्र्यंबकेश्वर या मंडळात हलका पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातही काही भागांत श्रावण सरी पडल्या. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे १०३ मिलिमीटर पाऊस झाला.

मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप होती. औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस नव्हता. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. तर चंद्रपूर जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, धानोरा, एटापल्ली या मंडळांमध्ये श्रावण सरी झाल्या. तर गोंदीया, नागपूर,वर्धा,वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही ठिकठिकाणी हलक्या पावसानं हजेरी लावली.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा तर विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला. तर राज्याच्या उर्वरित भागांमध्ये हलक्या सरी पडतील, असा अंदाज व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com