Weather Updates:राज्यात पावसाचा `येलो अलर्ट`

राज्यातील अनेक भागांत बुधवारी पावसानं (Rainfall) हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.सातारा (Satara) जिल्ह्यातही धरणक्षेत्रात हलक्या सरी झाल्या. सांगली जिल्ह्यात मात्र पावसाने उघडीप दिली होती.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

पुणेः राज्यात पाऊस कमी झाल्यानं ऊन तापत आहे. बुधवारी राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी झाल्या. हवामान विभागाने (IMD) उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

राज्यातील अनेक भागांत बुधवारी पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सातारा (Satara) जिल्ह्यातही धरणक्षेत्रात हलक्या सरी झाल्या. सांगली जिल्ह्यात मात्र पावसाने उघडीप दिली होती.

मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. तर काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. तर औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. विदर्भातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.

पूर्व विदर्भात अनेक भागांत मध्यम पाऊस झाला. गडचिरोली, गोंदीया आणि वर्धा जिल्ह्यात हलक्या सरी पडल्या. तर यवतमाळ जिल्ह्यातही काही भांगांत जोरदार सरी झाल्या. खानदेशातही तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक (Nashik) जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस पडल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. नगर जिल्ह्यात धरणक्षेत्रात काही वेळ हलका पाऊस झाला. मात्र सर्वत्र पावसाचा जोर कमी होता.

विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. नागपूर, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केलाय.

तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदजा हवामान विभागाने जाहीर केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com