Agriculture Drone : तरुणांना मिळणार ड्रोन उडवीण्याचे प्रशिक्षण

सिंजेंटा इंडिया प्रा.लि आणि आयओटीटेकवर्ल्ड एव्हिएशन या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार
Agricultural Drone
Agricultural DroneAgrowon

ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणीबाबत (Pesticide Spraying) शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी कृषीरसायन क्षेत्रातील प्रसिद्ध स्विस कंपनी सिंजेंटा (Syngenta) इंडिया प्रा.लि ने ड्रोन तयार करणारी कंपनी आयओटीटेकवर्ल्ड एव्हिएशनसोबत सामंजस्य करार केला आहे.

विशेष म्हणजे या करारानुसार दोन्ही कंपन्या ग्रामीण तरुणांना ड्रोन (Drone) उडवण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षीत तरुणांना या कंपन्यांमार्फत रोजगाराच्या संधीही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.  

Agricultural Drone
Agriculture Drone : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ड्रोन प्रशिक्षण देण्याची मान्यता

प्रशिक्षण देण्यासाठी तरुणांना ४०० एकर पेक्षा जास्त जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या करारांतर्गत साधारण २० पिकांमध्ये ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे प्रात्यक्षिके घेतली जातील.

फवारणीसाठी एग्रीबोट,आयओटीटेक ड्रोन आणि सिंजेंटा कंपनीच्या कीटकनाशकांचा वापर केला जाईल. अशी माहिती सिंजेंटा इंडियाचे एमडी आणि कंट्री हेड सुशील कुमार यांनी दिली.

सिंजेंटा आणि आयओटेक वर्ल्ड भारतातील खेड्यापाड्यांतील २०० कृषी उद्योजक आणि उद्योजकांना या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एकत्र काम करत आहे.

पिकांसाठी सुरक्षीत असलेल्या कीटकनाशकांचा वापर करण्यासाठी तसच उत्पादन खर्च कमी करुन जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल  यासाठी सिंजेंटाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.  

सिंजेंटाने गेल्या वर्षी १३ राज्यांमध्ये १७ हजार किलोमीटरचा प्रवास करत १५ हजार शेतकऱ्यांपर्यंत ड्रोन तंत्रज्ञानाविषयी माहिती पोहचविण्याचे काम केले आहे. अशी माहिती सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फार्मर सेंट्रल इकोसिस्टमचे प्रमुख सचिन कामरा यांनी दिली. 

ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमची कंपनी प्रयत्न करत आहे अशी माहिती आयओटेकवर्ल्ड इरिगेशनचे संचालक दीपक भारद्वाज यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com