Uday Samant : चांगल्या प्रकल्पांच्या स्वागताची भूमिका तरुणाईने घ्यावी

रत्नागिरीच्या समुद्रकिनारी स्टील इंडस्ट्रीज उभारून हजारो मुलांना रोजगार देऊ, असे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी दावोस येथे सांगितले.
Uday Samant
Uday SamantAgrowon

Ratnagiri News : कोकणात (Kokan) अनेक कंपन्या येण्यास उत्सुक आहेत; मात्र त्यासाठी आपल्या तरुणाईने मानसिकता बदलली पाहिजे.

भविष्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केले.

पुढील वर्षी रत्नागिरीतील प्रकल्पांमध्येच नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी मेळावा घेतला जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले.

शिर्के प्रशालेच्या मैदानावर आयोजित महाराष्ट्रातील पहिल्या रोजगार महामेळाव्याच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उद्योग विभाग सहसंचालक सतीश भामरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, उद्धव माने, अण्णा सामंत, ‘युवा हब’चे संचालक किरण रहाणे, राहुल पंडित, शशिकांत चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Uday Samant
Hapus Mango : रत्नागिरी जिल्ह्यातून हापूसची पहिली पेटी पुणे बाजारात रवाना

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात नोकरी महोत्सव घेण्याच्या निर्णयाची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून झाली. या महोत्सवात १३० कंपन्या सहभागी असून चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळच्या टप्प्यात १९७८ पैकी ७६४ जणांना थेट नियुक्तीचे पत्र दिले आहे. तर ६२८ जणांच्या पुन्हा मुलाखती होणार असून उर्वरित तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल.

मेळाव्यात थेट नियुक्तीचे पत्र देण्याचा टक्का ४० आहे. येथे आलेल्या शेवटच्या मुलाला नोकरी देण्याची जबाबदारी उद्योग विभागाची आहे, असे मंत्री सामंतांनी सांगितले.

पालकमंत्री सामंत म्हणाले, की रत्नागिरीच्या समुद्रकिनारी स्टील इंडस्ट्रीज उभारून हजारो मुलांना रोजगार देऊ, असे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी दावोस येथे सांगितले. तर इलेक्ट्रॉनिक मोटर्स हब रत्नागिरीत उभारण्याची इच्छा सज्जन जिंदाल यांनी व्यक्त केली.

जिथे प्रकल्प आणले जातात, तेथे विरोध होतो व आंदोलने केली जातात. ती थांबवा, आम्ही पाच ते दहा हजार मुलांना रोजगार देणारे प्रकल्प आणू. याचा विचार करून मेळाव्याला उपस्थितांनी प्रकल्पाच्या स्वागताची मानसिकता बनवावी.

कोकणात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांच्या स्वागताची भूमिका घ्यावी. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळायला हवा, काम मिळावे म्हणून शिंदे-फडणवीस सरकार प्रामाणिकप्रमाणे काम करीत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com