Zero Energy : शून्य ऊर्जा शीत कक्षाचे प्रात्यक्षिक

बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीत कक्षाचे महत्त्व प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले.
Zero Energy
Zero EnergyAgrowon

बेनवडी (जि.नगर) ः बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा (Zero Energy ) शीत कक्षाचे (Cold Room) महत्त्व प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले.

Zero Energy
Agricultural Electricity : कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करा

कृषिकन्यांनी शून्य ऊर्जा शीत कक्षाची उभारणी शास्त्रीय पद्धतीने कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच शीत कक्षाचे फायदे आणि शीत कक्ष बांधताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.

शून्य ऊर्जा शीत कक्षामध्ये कमी खर्चात भाजीपाला उत्तम प्रकारे कसा टिकवून ठेवावा, याबाबत जागरूकता केली. कृषिकन्या मेघा पाटील, मोनाली शिरकुळे, रेवती चव्हाण, शरयू कोंडे, कल्याणी जाधव, ऐश्वर्या के. बी., लिखिता कोराबोईना यांनी प्रात्यक्षिकाचे नियोजन केले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य एस.पी.गायकवाड आणि कृषी अभियांत्रिकी शास्त्र विभागातील तज्ज्ञ पी.जी. पाटील यांनी शून्य ऊर्जा शीत कक्ष उभारणीबाबत कृषिकन्यांनी मार्गदर्शन केले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com