ZP Fund : जिल्हा परिषद समाज कल्याणच्या १५ कोटींच्या निधी खर्चाचा मार्ग खुला

सत्तांतरानंतर शिंदे -फडणवीस सरकारने जिल्हा वार्षिक योजनेतील निधीवर स्थगिती दिली होती.
Government Fund
Government FundAgrowon

नाशिक : सत्तांतरानंतर शिंदे -फडणवीस सरकारने (Shinde Fadanvis Government) जिल्हा वार्षिक योजनेतील निधीवर स्थगिती दिली होती. मात्र, सरकारने जिल्हा वार्षिक योजनेतील अनुसूचित जाती घटक उपयोजनेतील मंजूर निधीच्या (Government Fund) नियोजनावरील स्थगिती उठविली असून, या निधी नियोजनाचा फेर आढावा घेण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत.

Government Fund
Agriculture Electricity : बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘ठिय्या’

यामुळे नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या २.८० कोटी तर, प्रादेशिक समाज कल्याण विभागाला प्राप्त १२.५ कोटी अशा एकूण १४.८५ कोटींच्या निधीतील नियोजनाचा मार्ग खुला झाला आहे.

Government Fund
Agriculture : शेतीचे प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले

ही स्थगित उठविल्याने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे रखडलेले नियोजन सुरू होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सप्टेंबर महिन्यात सरकारने रखडलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.

यानंतर नियोजन विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मंजूर निधीच्या नियोजनावरील स्थगिती उठवत, पालकमंत्र्यांच्या संमतीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महिना उलटूनही २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ६०० कोटींच्या निधीचे नियोजनाचे घोंगडे भिजत पडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com