जिल्हा परिषदा या नेतृत्व तयार करणाऱ्या शाळा

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन नेतृत्वाची फळी राज्यात निर्माण झाली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Agrowon

पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमातून नवीन नेतृत्वाची (New Leadership) फळी राज्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदा या नेतृत्व तयार करणाऱ्या शाळा (School Of Leadership) आहे. पुणे जिल्हा परिषदेमधून २४ जिल्हा परिषद सदस्य हे आमदार, तर ५ सदस्य मंत्री झाले आहेत, ही गौरवास्पद बाब आहे,’’ असे गौरवौद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी काढले

पुणे जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सव (Pune ZP Diamond Jubilee) समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार अशोक पवार, चेतन तुपे, अतुल बेनके, सुनील टिंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

श्री पवार म्‍हणाले, ‘‘महिला आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची संख्या वाढली आहे. पुणे जिल्हा परिषदेने ६० वर्षांत केलेले कार्य उल्लेखनीय आहे. जिल्हा परिषदेची इमारत अत्यंत चांगली आहे. या इमारतीमधून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल होणारे काम व्हावे.’’

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ‘‘सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी १९६२ साली स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्या. तेव्हापासून पुणे जिल्हा परिषदेने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.’’

गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले,‘‘पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळते. पुणे जिल्हा परिषद गेल्या साठ वर्षांपासून याच दिशेने काम करीत आहेत.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक चांगले नेते राज्याला मिळाले. ’’

प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, की जिल्हा परिषद एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. पुणे जिल्हा परिषदेचा १ ते ३८ महिला सदस्य हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील १ हजार किमी रस्ते ते १३ हजार किमी रस्ते ही वाटचालही उल्लेखनीय आहे. जिल्हा परिषदेत १ हजार १८३ विविध प्रकारची कामे होत आहेत.

या वेळी कार्यक्रमात ‘प्रोसेस मॅपिंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

जिल्हा परिषद विकासाचा मार्ग दाखविणारी संस्था ः मुश्रीफ

ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद सर्व घटकांना विकासाचा मार्ग दाखविणारी संस्था आहे. राज्य शासन दर वर्षी पंचायतराज अभियान राबवत असून चांगले काम करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात येतो. कोरोना काळातही अनेक महत्त्वाचे निर्णय ग्रामविकास विभागाने घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com