Swacha Sarvekshan : स्वच्छ सर्वेक्षणमध्ये ‘झेडपी’ राज्यात दुसरी

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -२०२१ या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्याने देशात लक्षणीय कामगिरी केली आहे.
Swacha Sarvekshan
Swacha Sarvekshan Agrowon

सोलापूर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -२०२१ (Swachh Survekshan Rural -2021) या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्याने देशात लक्षणीय कामगिरी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने (Solapur Z.P.) १००० गुणांपैकी ९५५.५३ गुणे घेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वच्छ सुंदर शाळा तसेच स्वच्छतेबाबत विविध उपक्रम हाती घेतले होते. जिल्ह्याने देशात पहिल्या टॉप ५० मध्ये स्थान पटकाविले आहे. देशात एकूण ७०९ जिल्हे आहेत. १००० गुणापैकी ९५५.५३ गुण सोलापूर जिल्ह्याने प्राप्त केले आहेत. नुकताच केंद्र शासनाचे

Swacha Sarvekshan
PM Kisan : अमरावती जिल्ह्यातील २३ हजारांवर शेतकरी अपात्र

जलशक्ती मंत्रालयाने अहवाल प्रकाशित केला आहे.

देशात स्वच्छ जिल्हा म्हणून गौरव झालेला सिंधुदुर्ग जिल्हा गुणांकनात देशात दहावा आहे. राज्यात सिंधुदुर्ग पहिला (९८३.०४ गुण), सोलापूर द्वितीय (९५५.५३ गुण) आणि सांगली तृतीय (९३९.१३ गुण) मिळाले आहेत. फिडबॅकमध्ये सोलापूर जिल्हा देशात द्वितीय आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत श्री. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम कामगिरी सोलापूर जिल्हा परिषदेने केली आहे.

महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, उमेदसह सर्व विभागांतील अधिकारी कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले आहे. या अभियानासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता. श्री. स्वामी यांनी यासाठी मोहीम स्वरूपात काम केले. सर्व विभाग प्रमुखांना विश्‍वासात घेतले. त्याचेच हे फलित असल्याचे सांगितले जाते.

जिल्हा परिषेदेने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ मध्ये चांगली कामगिरी केली. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनसाठी परसबागा, शोषखड्डे, स्वच्छ व सुंदर शाळेमुळे शालेय स्वच्छतागृह, घनकचरा व्यवस्थापन अशा एक हजार गुणांचे रॅंकिंग होते. प्रत्यक्ष केंद्रीय समितीने या कामांची पाहणी केली. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली आहे. आमच्या टीमवर्कचे हे यश आहे.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com