Pune ZP Recruitment : झेडपी ८८९ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविणार

जिल्हा परिषदेतील विविध खात्यांतील ८८९ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे.
Pune ZP
Pune ZPAgrowon

Pune News जिल्हा परिषदेतील विविध खात्यांतील ८८९ पदांसाठी भरतीप्रक्रिया (ZP Recruitment) राबविण्यात येत आहे. नोकर भरतीसाठी जिल्हा परिषद स्वतः प्रश्‍नपत्रिका तयार करणार असून, ती एजन्सीद्वारे केली जाणार आहे, अशी माहिती झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी दिली.

Pune ZP
Pune Water Storage: पुणे जिल्ह्यातील २१ धरणांत ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेशी करार करण्यात आला आहे. या एजन्सीने यापूर्वी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार घेतलेल्या प्रश्‍नपत्रिकेवर काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

Pune ZP
Pune ZP Loan : पुणे ‘झेडपी’च्या दहा हजार बचत गटांना ३०० कोटीचे कर्ज

भरतीप्रक्रियेसाठी संबंधित एजन्सीला अभ्यासक्रमाचा पॅटर्न दिला जाणार आहे. त्यानुसार प्रश्‍नपत्रिका तयार केली जाईल. भरती प्रक्रिया ऑनलाइनद्वारे होणार असून, यातील कोणतीही प्रश्‍नपत्रिका फुटणार नाही, अशा पद्धतीने भरती प्रक्रिया होणार आहे.

जिल्हा परिषदेत ३४ विभागांतील कर्मचाऱ्यांची भरती होणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. मात्र प्रश्‍नपत्रिका योग्य पद्धतीने व त्या पदासाठी पूरक असणे क्रमप्राप्त आहे. परीक्षेच्या पाच मिनिटांपूर्वी प्रश्‍नपत्रिका संबंधित केंद्रावर पोहोचणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रश्‍नपत्रिका फुटणार नसल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com