agriculture new in Marathi, agri commissioner dawale says, farmers should sowing soybean by BBF system, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनी बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड करावी: कृषी आयुक्त डवले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

अकोला ः बुलडाणा जिल्ह्यातील मूळचे माळवंडी येथील रहिवाशी असलेले कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले रविवारी (ता. ९) गावात आले असताना त्यांनी विविध प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. गावशिवारात अधिकाधिक क्षेत्रावर या हंगामात बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले.

अकोला ः बुलडाणा जिल्ह्यातील मूळचे माळवंडी येथील रहिवाशी असलेले कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले रविवारी (ता. ९) गावात आले असताना त्यांनी विविध प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. गावशिवारात अधिकाधिक क्षेत्रावर या हंगामात बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले.

श्री. डवले गावी आलेले असताना त्यांनी माळवंडी नजीक उमरखेड शिवारात सुरू असलेल्या सामूहिक शेततळ्याच्या कामाची पाहणी केली. गावात मिरचीची लागवड केलेल्या काही शेतांना भेटीही दिल्या. त्यानंतर बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची लागवड करण्यासाठी पेरणी यंत्राचा वापर कसा करता येईल, यासाठी माधवराव चव्हाण यांच्या शेतात श्री. डवले यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आले. शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली. पेरणी यंत्राला काही साधने लावली तर त्याचा बीबीएफसारखा कितपत उपयोग होतो, हे पाहण्यात आले. 

सोयाबीनच्या दोन तासातील अंतर किती असावे, बियाण्याचे प्रमाण किती असावे, यावरही सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असा आग्रह श्री. डवले यांनी खासकरून केला. या वेळी विष्णू बेंडे, अनिल सोनोने, एकनाथ खोरे, अशोकराव चव्हाण, सुरेश शिंदे, संजय शिंदे, कृषी सहायक विलास रिंढे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते. 

इतर अॅग्रो विशेष
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...