agriculture new in marathi good Resistance can prevent corona to get out | Page 2 ||| Agrowon

चांगली प्रतिकारशक्ती कोरोनावर करते मात; ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांचे संशोधन

वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

मेलबर्न : कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील संशोधकांकडे एक चांगली बातमी आहे. ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या पहिल्या रुग्णाच्या शरिरातील प्रतिकारशक्तीने या संसर्गाचा कशा प्रकारे मुकाबला केला याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे.

मेलबर्न : कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील संशोधकांकडे एक चांगली बातमी आहे. ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या पहिल्या रुग्णाच्या शरिरातील प्रतिकारशक्तीने या संसर्गाचा कशा प्रकारे मुकाबला केला याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. मानवी शरिरातील प्रतिकारशक्ती या विषाणूचा प्रतिकार करण्यास सक्षम असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. तसेच, चांगली प्रतिकारशक्ती असेल तर रुग्ण तीन दिवसांत बरा होऊ शकतो, अशी नवी माहिती या अभ्यासातून पुढे आली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात कहर केला आहे. त्यामुळे या विषाणूवर औषध शोधण्यासाठी अनेक देशांमधील संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑस्ट्रेलियातील पीटर डोहेर्टी इंस्टिट्यूट फॉर इन्फेक्शन ऑंड इम्युनिटी या संस्थेतील संशोधकांनी ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या रुग्णाचा अभ्यास केला. मेलबर्न विद्यापीठ आणि रॉयल मेलबर्न रुग्णालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे संशोधन करण्यात आले.

ऑस्ट्रेलियातील पहिल्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर या विषाणूच्या संसर्गाला रुग्णाच्या शरिरातील प्रतिकारशक्ती कशा प्रकारे प्रतिसाद देते याचा अभ्यास संशोधकांनी केला. निरोगी असलेल्या ४० वर्षांच्या महिलेत कोरोनाची अल्प ते मध्यम स्वरुपाची लक्षणे आढळून आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या रक्ताचे चार वेगवेगळ्या वेळी नमूने घेण्यात आले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीन दिवसांनी दिसून आले की रुग्णाच्या शरिरातील प्रतिकारक्षम पेशींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. शीतज्वर झालेल्या रुग्णाच्या शरिरातही अशाच प्रकारची प्रक्रिया घडून येते. सामान्यपणे हे रुग्ण बरा होण्याचे लक्षण मानले जाते.

ही माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्ण तीन दिवसांत बरा होईल अशी शक्यता आम्ही वर्तविली होती, जी संबंधित रुग्णाच्या बाबत खरी ठरल्याचे दिसून आले, अशी माहिती डॉ. ओआन्ह न्युयेन यांनी दिली. कोरोनाच्या विरोधातील लस शोधण्यासाठी संशोधकांना या अभ्यासाची मोलाची मदत होणार आहे.

मृत्यूचे कोडे उलगडणार?

  • कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू कशामुळे होते हे शोधण्यासाठी हा अभ्यास महत्वाचा ठरणार आहे
  • कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या शरिरात नेमकी काय कमतरता होती हे शोधता येणार
  • कोरोनाच्या ८० टक्के रुग्णांमध्ये अल्प ते मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसतात, या रुग्णांमधील प्रतिकारशक्तीचा प्रतिसादाचा अभ्यास ठरणार कळीचा मुद्दा
  • नेचर मेडिसिन नियतकालिकात हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषद निवडणूक पुढे ढकलल्याने...मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
पुणे बाजार समितीत १८ हजार क्विंटल...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
खटाव तालुक्यातील बागांमध्ये निर्यातक्षम...कलेढोण, जि. सातारा  : ‘कोरोना’च्या...
पुणे जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांच्या ...पुणे  ः गत आठवड्यात पुणे जिल्ह्यातील काही...
घराला भरभराट देणारी फळे जागेवरच गळून...नगर ः ‘‘यंदा पहिल्यांदाच गावांत अनेक...
परीक्षा रद्द होणार नाहीत, विद्यापीठ,...मुंबई ः राज्यातील कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव...
पंतप्रधान, खासदारांच्या वेतन कपात;...नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील संघर्षासाठी...
पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला मुंबई  ः पालघर जिल्हा रविवारी (ता.५) रात्री...
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...