नाशिकला ग्राहक मंचाचे २१ पासून राष्ट्रीय अधिवेशन

नाशिकला ग्राहक मंचाचे  २१ पासून राष्ट्रीय अधिवेशन
नाशिकला ग्राहक मंचाचे २१ पासून राष्ट्रीय अधिवेशन

नाशिक : अखिल भारतीय ग्राहक मंचाचे २१ आणि २२ एप्रिल असे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार आहे. अधिवेशनात मंचाचे देशाभरातील सर्वच राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्याचे उद् घाटन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार सदस्य समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये समितीचे राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय झाला. या अधिवेशनासाठी केंद्रीय अन्न पुरवठामंत्री पासवान, राज्याचे पुरवठामंत्री गिरीश बापट, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आदींना आमंत्रित करण्यात येणार आहे. अधिवेशनात ग्राहकांना अन्नपुरवठा करणाऱ्या वितरण पद्धतीतील दोष आणि त्यावरील उपायांवर चर्चा होईल; तसेच राज्या-राज्यांतील सदस्यांकडून मांडण्यात येणाऱ्या अडचणींवर नेमकी काय उपाययोजना करता येईल याबाबत ऊहापोह होईल. ग्राहक सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख होण्यासाठी काय काय सुविधा करता येतील, यावर अधिवेशनात विशेष लक्ष दिले केंद्रित केले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या वेळी प्रा. दिलीप फडके, औरंगाबादचे प्रांत कार्यकारिणी समिती सदस्य ओमकार जोशी, रवींद्र इंगळीकर, जळगावचे विकास महाजन, राजेंद्र कोतले, सुभाष देशपांडे, श्रीकांत देशपांडे, प्रकाश सोनी, चंद्रशेखर वाड आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com