‘कृषी सन्मान’चे चार हजार १८ जुलैपर्यंत बँक खात्यात

‘कृषी सन्मान’चे चार हजार १८ जुलैपर्यंत बँक खात्यात
‘कृषी सन्मान’चे चार हजार १८ जुलैपर्यंत बँक खात्यात

नागपूर : केंद्र पुरस्कृत असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात १८ जुलैपर्यंत दोन हप्त्यांचे राहिलेले चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत, अशी महिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. नागपूर विभागाचा खरीप आढावा त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री बोंडे यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत राज्यात एकूण लाभार्थी शेतकऱ्यांपैकी केवळ ६१ टक्के शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. आयकर भरणारे १५ टक्‍के अपवाद वगळता ८५ टक्‍के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. १० जुलैपर्यंत आणखी पात्र लाभार्थ्यांची यादी अपलोड करण्यात येईल. त्यानंतर आठ दिवसांत म्हणजेच गुरुवार (ता. १८) पर्यंत राज्यातील योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार रुपयांचे दोन याप्रमाणे चार हजार रुपये जमा होतील, असेही डॉ. बोंडे यांनी सांगितले. नागपूर विभागात ११ लाख १७ हजार ४२३ शेतकरी पात्र असून, त्यापैकी ६ लाख ९१ हजार १२५ शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत कृषी सहायकांकरिता बैठक व्यवस्था करण्याचे निर्देश त्या-त्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामुळे कृषी सहायक गावात उपलब्ध होत, तंत्रज्ञान बांधापर्यंत पोचण्यास मदत होणार आहे.

एचटीबीटीप्रकरणी विक्रेत्यांना पकडा एचटीबीटी बियाणे विक्री कायद्याने गुन्हा आहे. राज्यात सध्या एचटीबीटी प्रकरणी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हा प्रकार चुकीचा आहे. त्याऐवजी बियाणे बाळगणाऱ्या, विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशा सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com