agriculture new in marathi Sant Dnyaneshwar Samadhi Sohala, Alandi, Pune, Maharahtra | Agrowon

माउलींच्या समाधिसोहळ्याने गहिवरली आळंदी

विलास काटे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

माउली नामाच्या अखंड जयघोषात रविवारी दुपारी वैष्णवांनी तुळशीच्या मंजिऱ्या आणि फुलांची मुक्त उधळण करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा रविवारी (ता.१३) गहिवरल्या वातावरणात साजरा केला.

आळंदी, जि. पुणे : टाळ मृदंगाचा टिपेला पोचलेला गजर... अन्  माउली नामाच्या अखंड जयघोषात रविवारी दुपारी वैष्णवांनी तुळशीच्या मंजिऱ्या आणि फुलांची मुक्त उधळण करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा रविवारी (ता.१३) गहिवरल्या वातावरणात साजरा केला.

संत नामदेवांचे सतरावे वंशज ज्ञानेश्‍वर महाराज नामदास यांच्या सुश्राव्य वाणीतून माउलींच्या समाधी प्रसंगाच्या सातशे पंचवीस वर्षांपूर्वीच्या आठवणीचे वर्णन ऐकताना देऊळवाड्यातील वारकऱ्यांच्या नयनांच्या कडा मात्र पाणावल्या. 

कार्तिक वद्य त्रयोदशी असल्याने साडेआठच्या सुमारास महाद्वारात गुरू हैबतबाबांच्या वतीने ऋषिकेश आरफळकर यांचे कीर्तन, तर साडेदहा वाजता वीणा मंडपात नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्‍वर महाराज नामदास यांचे माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन सुरू झाले. समाधी प्रसंगाची वेळ जवळ आल्याने पाणदरवाजातून भाविकांची विशेष गर्दी मंदिरात येत होती. देऊळवाडा नागरिक आणि पोलिसांच्या उपस्थितीने पूर्ण भरून गेला होता. 

या दरम्यान, वीणा मंडपातील ज्ञानेश्‍वर महाराज नामदास यांनी कीर्तनात ‘ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजन,’ असे म्हणत समाधी प्रसंगाचे वर्णन करण्यास सुरुवात केली. मंदिरात कीर्तन चालू असतानाच समाधीची सजावट चालू असतानाच वीणा मंडपातील नामदास महाराजांनी संत नामदेव महाराजांच्या पादुका हातात घेउन समाधीजवळ नेऊन बारा वाजता स्थानापन्न केल्या. या वेळी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अॅड. अभय टिळक आणि अॅड. विकास ढगे यांनी पादुकांची विधिवत पूजा केली. या वेळी विश्‍वस्त योगेश देसाई, बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, पोलिस ज्ञानेश्‍वर साबळे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, पंढरपूर देवस्थानचे विश्‍वस्त अॅड. माधवी निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

दरम्यानच्या काळात वीणा मंडपातील नामदास महाराजांनी आपल्या कीर्तनातून 
अवघी जयजयकारे पिटीयेली टाळी । 
उठली मंडळी वैष्णवांची ।।
सहमंडळी सारे उठले ऋषिश्‍वर ।
केला नमस्कार समाधीसी ।।

असे कीर्तनात सांगताच उपस्थित भाविकांचे अश्रू दाटून आले. सातशे पंचवीस वर्षांपूर्वीच्या समाधी प्रसंगाच्या आठवणीने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आता माउलींचा समाधी प्रसंग जवळ येऊन ठेपला होता. नामदेव महाराजांच्या पादुकांच्या पूजनानंतर भाविकांनी घंटानाद करून हातातील तुळशीच्या मंजिऱ्या आणि फुलांची मुक्त उधळण करत ‘पुडंलिक वरदे हरि विठ्ठल’ आणि माउलीनामाचा धावा केला. त्यानंतर श्री पांडुरंगाची आणि माउलीची आरती झाल्यानंतर विश्‍वस्तांच्या हस्ते नामदास कुटुंबीयांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. महाराजांच्या पादुका डोक्यावर घेत मंदिर प्रदक्षिणा केली. भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. 

...अन्‌ ‘त्यांना’ मुक्त प्रवेश!
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू केली. देऊळवाड्यातही वारकऱ्यांना प्रवेश नव्हता. राज्य शासनाने घातलेल्या बंदीचा स्वीकार करून अनेक वारकरी घरीच बसून राहिले. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांचे सगेसोयरे आणि आळंदी परिसरातील अनेक नागरिकांना मुक्त प्रवेश होता. पिढ्यान् पिढ्या ज्यांच्या घरात वारी होती. त्यांना घरी बसावे लागले. दुसरीकडे ‘वशिल्यांची वारी’ मात्र बंदोबस्तावरील पोलिसांच्या कृपेने अनेकांना झाली. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...