agriculture news in agricutlure On April 5, at 9 pm, light Diya, candle for 9 minutes to mark fight against coronavirus: Modi | Agrowon

‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी रात्री ९ वाजता दिवे लावा’ 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची जाणीव तीव्र करण्यासाठी रविवारी (ता.५) रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांनी ९ मिनिटे घरातील विजेचे दिवे बंद करावेत,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची जाणीव तीव्र करण्यासाठी रविवारी (ता.५) रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांनी ९ मिनिटे घरातील विजेचे दिवे बंद करावेत,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘या ९ मिनिटांत देशवासीयांनी लॉकडाऊन न मोडता स्वतःच्या घराच्या गॅलरीत मेणबत्ती, दिवे किंवा मोबाईल टॉर्च लावावी व कोरोनाला हटविण्यासाठी प्रकाशाची महाशक्ती जागृत करावी’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणू साथीने देशात आत्तापर्यंत २०६९ संसर्ग केला असून ५३ जणांचे बळी घेतले आहे. त्यामुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन देशभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज (ता.३) सकाळी ९ वाजता देशवासीयांशी संवाद साधला. पंतप्रधानांच्या या संवादाकडे देशवासीयांचे लक्ष लागून होते. कोरोना विरोधात लढणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांच्या कतृत्वाला दाद देण्यासाठी २२ मार्चला थाळ्या, टाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. यामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग अर्थात सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडविला गेला होता. 

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याविषयी काहीही भाष्य केले नाही. ते म्हणाले, ‘‘रविवारी देखील लॉकडाऊन पाळायचे आहे. रस्त्यावर, गल्लीत जाऊ नये. नागरिकांनी घराबाहेर देखील पडू नये. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. स्वयंस्फूर्तीने ९ मिनिटे दीप प्रज्वलन करावे. त्यामुळे कोरोना विरोधी लढण्याची ऊर्मी तीव्र होईल.’’ 

"प्रकाशाच्या माध्यमातून १३० कोटी भारतीय एका हेतू साठी लढत असल्याचे आपल्याला दाखवून द्यायचे आहे. पण माझी पुन्हा सर्व नागरिकांना विनंती आहे की कुणीही घराबाहेर पडायचे नाही. दारात, बाल्कनीत, घरात दिवे लावून सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मण रेषा पाळावी. कारण, तोच कोरोना च्या विरोधात रामबाण उपाय आहे,"असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. 
 


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...