आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजार

अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण, खेडला बसला होता. बाधित कुटुंबातील ज्यांची भांडीकुंडी व कपड्यांचे नुकसान झाले, त्यांना कुटुंबामागे ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजार To disaster-stricken families You will get five thousand
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजार To disaster-stricken families You will get five thousand

रत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण, खेडला बसला होता. बाधित कुटुंबातील ज्यांची भांडीकुंडी व कपड्यांचे नुकसान झाले, त्यांना कुटुंबामागे ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात २२ व २३ जुलैला निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा सर्वाधिक फटका चिपळूण, खेड शहरांना बसला. वाशिष्ठी, जगबुडीच्या पुरामध्ये अनेक कुटुंबांमधील घरातील सर्वच साहित्य वाहून गेले. अचानक पूर आल्यामुळे हो गोंधळ झाला होता. अनेकांनी घरातील साहित्य जागेवरच सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होणे पसंत केले. काहींनी घराच्या माळ्यावर बसून दोन दिवस काढले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर घरातील सर्वच साहित्य वाहून गेल्याची संख्या अधिक आहे. चिपळूण शहरात हे प्रमाण तुलनेत सर्वाधिक आहे. शासनाकडून त्यांना तत्काळ मदतीसाठी पावले उचलण्यात आली आहेत. गहू, तांदळासह केरोसीनचे वाटप अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना १ ऑगस्ट २०२१ अखेरपर्यंत ८६ गावातील एकूण १ हजार ६२६ कुटुंबांना १६२.६० क्विंटल गहू व १६२.६० क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले. ३७ गावातील ३०४ कुटुंबांना १ हजार ५२० लिटर केरोसीनचे वाटप केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com