चंद्रपूरमधील हमीभाव केंद्रे बंद; धान उत्पादक अडचणीत 

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण २७ पैकी २४ धान हमीभाव केंद्रे बंद आहेत. मूल येथील धान खरेदी केंद्र ही बंद आहे. खरीप हंगामातील धानाची वाढलेली आवक आणि शेतमाल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही
चंद्रपूरमधील हमीभाव केंद्रे बंद; धान उत्पादक अडचणीत Guarantee centers closed in Chandrapur; Grain growers in trouble
चंद्रपूरमधील हमीभाव केंद्रे बंद; धान उत्पादक अडचणीत Guarantee centers closed in Chandrapur; Grain growers in trouble

मूल, जि. चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण २७ पैकी २४ धान हमीभाव केंद्रे बंद आहेत. मूल येथील धान खरेदी केंद्र ही बंद आहे. खरीप हंगामातील धानाची वाढलेली आवक आणि शेतमाल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून केंद्रच बंद असल्याने नोंदणी केलेल्या ८८३ शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.  ढगाळ वातावरणाचाही परिणाम झाला आहे. खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाची उचल होत नसल्याने गोदामे हाउसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यातील २७ पैकी २४ केंद्रे बंद आहेत. मूल तालुका हा धान उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील तांदळाचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय आधारभूत केंद्र उघडण्यात आले आहे. खासगी व्यापाऱ्यांसह येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचप्रमाणे धानाला शासकीय हमीभावही चांगला आहे. यंदा आधारभूत केंद्रातही धानाची आवक महिन्याभराआधीच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या केंद्राला चंद्रपूर तालुकाही जोडलेला आहे. शासकीय नियमानुसार आधारभूत केंद्रावर आपला शेतमाल विकण्यासाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी नोव्हेंबर २०२० पासून नोंदणीकरिता अर्ज सादर केले आहेत. त्यानुसार आतापर्यंत १ हजार १५१ अर्ज येथील खरेदी केंद्राला प्राप्त झाले होते. त्यापैकी फक्त २६५ शेतकऱ्यांचे ९ हजार ७४२.३५ क्‍विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. उर्वरित ८८६ शेतकऱ्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्याकरिता आणि खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने मागील आठ दिवसांपासून हे खरेदी केंद्र बंद आहे. जागेअभावी आणि वातावरणातील बदलामुळे खरेदी केंद्र बंद असल्याने प्रलंबित अर्ज असलेल्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतमाल विकावा कुठे? अशा संभ्रमावस्थेत शेतकरी सापडला आहे. काही शेतकरी आपला शेतमाल कमी दरात थेट व्यापारांना विकून मोकळे होत आहेत. 

प्रतिक्रिया   आधारभूत केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे गोदामे हाउसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यात २७ ठिकाणी आधारभूत केंद्रे आहेत. त्यापैकी मूल, सिंदेवाही, गोंडपिपरी, कोठारी, पोंभुर्णा, नागभीड, राजोली यासह इतर क्रेंदे जागेअभावी बंद करण्यात आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे शेतमाल बाहेर ठेवू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.  -अनिल गोगीरवार, जिल्हा मार्केंटिग अधिकारी, चंद्रपूर.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com