नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी प्रयोग

नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी प्रयोग
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी प्रयोग

जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये विविध संस्था, कारखाने यांच्या सहकार्याने नदी नांगरणीचे काम वेगात सुरू आहे. काही ठिकाणी हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.  सातपुडा पर्वतालगत शहादा (जि. नंदुरबार), शिरपूर (जि. धुळे) व जळगाव तालुक्‍यातील रावेर, यावल आणि चोपडा हे तालुके आहेत. यातील शहादा, शिरपूर, यावल व रावेरात जलसंधारणाची अनेक कामे मागील चार-पाच महिन्यांत करण्यात आली.  शहादा तालुक्‍यातील सुमारे ५०-६० गावांची जीवनवाहिनी असलेल्या गोमाई नदीची नांगरणी पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्यातर्फे करण्यात आली. नदीत अनेक ठिकाणी मातीचा मोठा, जाड थर तयार झाला आहे. यामुळे नदीतून पाणी वाहून जाते. ते जिरत नाही. परिणामी नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे हवे तसे पुनर्भरण होत नाही. ही बाब लक्षात घेता नदी नांगरणीचे काम या भागात सुरू झाले. या अंतर्गत लोणखेडा ते मलोनी या गावांदरम्यान नदीची नांगरणी करण्यात आली. त्यात अधिक अश्‍वशक्तीचे ट्रॅक्‍टर, जेसीबी, पोकलेन मशिनचा उपयोग माती काढण्यासाठी करण्यात आला. ठिकठिकाणी लहान वाळूचे बंधारेदेखील तयार करण्यात आले. कामाची सुरवात कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या हस्ते झाली. यावल, रावेर तालुक्‍यातील सुकी, भोकरी, भोनक आदी नद्यांमध्येदेखील नांगरणी किंवा जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले. यासाठी सावदा (ता. रावेर) येथील स्वामिनारायण गुरुकुल, महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज, आमदार हरिभाऊ जावळे व इतर संस्थांनी पुढाकार घेतला. किनगाव (ता. यावल) नजीकच्या भोनक नदीमध्ये मातीचे थर दूर करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी वाळूचे बंधारे तयार केले. सातपुडा पर्वतातून येणाऱ्या नद्यांमध्ये पाणी जिरविण्याची मोठी क्षमता असून, जलसंधारणाच्या कामांमुळे पुढील वर्षी या भागातील जलपातळी वाढू शकेल. जोरदार पावसाची प्रतीक्षा या भागातील शेतकरी करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com