जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ताज्या घडामोडी
सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा साधेपणाने
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा बुधवारी (ता. १३) मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
सोलापूर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा बुधवारी (ता. १३) मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. शिवाय यात्रेतील सर्व धार्मिक विधीही प्रशासनाच्या नियम, अटीनुसार होत आहेत.
सुमारे साडेनऊशे वर्षांची परंपरा यात्रेला आहे. अक्षता सोहळा हा या यात्रेतील मुख्य समारंभ गणला जातो, त्याची मोठी परपंरा आहे. यामध्ये सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा लावला जातो. दरवर्षी या सोहळ्यादिवशी हिरेहब्बू वाड्यातून नंदिध्वज मिरवणूक काढली जाते.
ती सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर आल्यानंतर तिथे हा नयनरम्य असा सोहळा पार पडतो, पण यंदा नंदिध्वज मिरवणूक न काढता जागेवरच ठेवून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच अक्षता सोहळ्यापूर्वी सुगडी पूजन करून मानकऱ्यांना विडा देण्यात आला. त्यानंतर सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली,‘सत्यम सत्यम, दिड्डम, दिड्डम’ उच्चारताच उपस्थितांनी अक्षता टाकल्या.
अतिशय नयनरम्य आणि भावपूर्ण अशा वातावरणाचा हा सोहळा असतो. पण यंदा कोरोनामुळे मर्यादा असल्याने हा सोहळा आटोपशीर झाला. मंदिर परिसरात संचारबंदी लावल्याने भाविकांना या सोहळ्यात सहभागी होता आले नाही. पण घरातच अनेकांनी सिद्धरामेश्वरांची पूजा करून हा सोहळा साजरा केला.
- 1 of 1022
- ››