Agriculture news iAkshata ceremony in Siddharmeshwar Yatra simply | Agrowon

सिद्धरामेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळा साधेपणाने

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा बुधवारी (ता. १३) मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

सोलापूर : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा बुधवारी (ता. १३) मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. शिवाय यात्रेतील सर्व धार्मिक विधीही प्रशासनाच्या नियम, अटीनुसार होत आहेत

सुमारे साडेनऊशे वर्षांची परंपरा यात्रेला आहे. अक्षता सोहळा हा या यात्रेतील मुख्य समारंभ गणला जातो, त्याची मोठी परपंरा आहे. यामध्ये सिद्धरामेश्‍वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा लावला जातो. दरवर्षी या सोहळ्यादिवशी हिरेहब्बू वाड्यातून नंदिध्वज मिरवणूक काढली जाते.

ती सिद्धरामेश्‍वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर आल्यानंतर तिथे हा नयनरम्य असा सोहळा पार पडतो, पण यंदा नंदिध्वज मिरवणूक न काढता जागेवरच ठेवून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच अक्षता सोहळ्यापूर्वी सुगडी पूजन करून मानकऱ्यांना विडा देण्यात आला. त्यानंतर सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास अक्षता सोहळ्याला सुरुवात झाली,‘सत्यम सत्यम, दिड्डम, दिड्डम’ उच्चारताच उपस्थितांनी अक्षता टाकल्या. 

अतिशय नयनरम्य आणि भावपूर्ण अशा वातावरणाचा हा सोहळा असतो. पण यंदा कोरोनामुळे मर्यादा असल्याने हा सोहळा आटोपशीर झाला. मंदिर परिसरात संचारबंदी लावल्याने भाविकांना या सोहळ्यात सहभागी होता आले नाही. पण घरातच अनेकांनी सिद्धरामेश्‍वरांची पूजा करून हा सोहळा साजरा केला.


इतर बातम्या
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
खानदेशातून थंडी गायबजळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
परभणी जिल्ह्यात रब्बीत २४.०६ टक्के...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...