agriculture news inmarathi Possible temperature fluctuations in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात तापमानात चढ-उतार शक्य

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

आज (ता. २६) राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत: ढगाळ हवामान होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची प्रतीक्षा कायम आहे. आज (ता. २६) राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पावसाने उघडिपीनंतर राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. बहुतांशी ठिकाणी ३२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. उन्हाचा चटक्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३४.७ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. अद्यापही बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या पुढेच असून, महाबळेश्‍वर आणि निफाड येथे नीचांकी १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३३.१ (१८.७), नगर ३२.८ (१९.५), जळगाव - (२०.३), कोल्हापूर २८.६ (२१), महाबळेश्‍वर २६.२ (१७.१), मालेगाव ३०.४ (२४), नाशिक ३२.२ (१९.६), निफाड ३०.१ (१७.१), सांगली २९.६ (२०.५), सातारा ३० (२१.१), सोलापूर ३३.९ (१९.१), सांताक्रूझ ३४.३ (२५), अलिबाग ३२.४ (२४.४), डहाणू ३१.८ (२५), रत्नागिरी ३४.२ (२४.१), औरंगाबाद ३२.७ (१९), नांदेड - (२१), उस्मानाबाद - (१८), परभणी ३२.८ (१९.६), अकोला ३३.७ (२०.७), अमरावती ३२.८ (१७.५), ब्रह्मपुरी ३४.७ (१९.३), बुलडाणा ३१.८ (१९.४), चंद्रपूर ३१.८ (२०.६), गडचिरोली ३१ (१९.२), गोंदिया ३१.२ (१८.८), नागपूर ३२ (१९.६), वर्धा ३१.२ (१९.२), वाशीम ३३.५ (२०.५), यवतमाळ ३२.५ (२१.५).

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ जोरदार वारे वाहत आहेत. अंदमान समुद्रात सोमवारपर्यंत (ता. २९) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्‍चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....