कोकण, घाटमाथ्यावर आज सरींची शक्यता

कोकण, घाटमाथ्यावर आज सरींची शक्यता
कोकण, घाटमाथ्यावर आज सरींची शक्यता

पुणे: मॉन्सून काहीसा कमजोर झाल्याने राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यावर पाऊस पडत असला तरी मराठवाडा, विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज (ता. १४) कोकण, घाटमाथ्यावर काही ठिकाणी सरींची शक्यता आहे; तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.  शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. पाणलोटातून वाहणाऱ्या नदी, नाल्यांमुळे धरणांच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत आहे. कोयना धरणक्षेत्रातील नवजा येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली; तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विदर्भात मात्र पावसाची उघडीप कायम असल्याचे दिसून आले.   शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : वेंगुर्ला ७०, सावंतवाडी, राजापूर, मंडणगड, खालापूर, दोडामार्ग प्रत्येकी ५०, लांजा, कडाळ प्रत्येकी ४०, श्रीवर्धन, रत्नागिरी, सुधागड पाली, जव्हार, रोहा प्रत्येकी ३०.  मध्य महाराष्ट्र : धरणगाव ६०, पन्हाळा, राधानगरी, वेल्हे, शाहूवाडी प्रत्येकी ३०, गगनबावडा, आजरा प्रत्येकी २०.  मराठवाडा : तुळजापूर ४०, अर्धापूर, कंधार प्रत्येकी ३०, नायगाव खैरगाव, पाथरी प्रत्येकी २०, देवणी, देगलूर, लोहारा, लोहा, बिलोली, पालम, माजलगाव, मुखेड, धर्माबाद प्रत्येकी १०.  घाटमाथा : कोयना नवजा ११०, अंबोणे ७०, शिरगाव ६०, डुंगरवाडी ५०, वळवण, दावडी, कोयना पोफळी, खोपोली, ताम्हिणी प्रत्यकी ३०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com