Agriculture news in marahi, Crop insurance coverage of five lakh hectares in Pune region | Agrowon

पुणे विभागात पाच लाख हेक्टरला पीकविमा संरक्षण

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

पुणे : नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी खरिप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी आल्या. गेल्या वर्षीची कमी नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे योजनेस कमी प्रतिसाद मिळाला आहे. विभागात सात लाख ५७ हजार ३३ शेतकरी सहभागी झाले आहेत. विम्यापोटी पाच लाख ७८ हजार ४१६ हेक्टरला संरक्षण मिळाले असून कंपनीकडे एक हजार ४११ कोटी ८१ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम संरक्षित झाली आहे.   

पुणे : नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी खरिप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी आल्या. गेल्या वर्षीची कमी नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे योजनेस कमी प्रतिसाद मिळाला आहे. विभागात सात लाख ५७ हजार ३३ शेतकरी सहभागी झाले आहेत. विम्यापोटी पाच लाख ७८ हजार ४१६ हेक्टरला संरक्षण मिळाले असून कंपनीकडे एक हजार ४११ कोटी ८१ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम संरक्षित झाली आहे.   

यंदा जून-जुलै महिन्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग अशा विविध पिकांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. शेतकऱ्यांना विमा योजनेतील सहभागी होण्यासाठी ३० जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज भरताना सुविधा तत्पर न मिळल्याने पीक विम्यापासून अनेक शेतकऱ्यांना शेवटच्या दिवसापर्यत वेंटिंगवर राहावे लागल्याने असल्याचे चित्र होते. 

कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एेच्छिक स्वरूपाची होती. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर सत्तर टक्के निश्चित करण्यात आला. खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता फक्त दोन टक्के विमा हप्ता, नगदी पिकांकरिता पाच टक्के विमा हप्ता होता. विभागात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी २४ कोटी ९७ लाख ४२ हजार, राज्य हिस्सा ३८ कोटी ५३ लाख ३२ असे एकूण ६३ केोटी ५० लाख ७५ हजार रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे जमा झाला आहे.

पीकविमा योजनेत सहभागी शेतकरी

जिल्हा  शेतकरी संख्या विमा संरक्षित क्षेत्र, हेक्टर विमा हप्ता रक्कम (लाखांत) विमा संरक्षित रक्कम (लाखात रुपये) 
नगर ४,१८,४६२ २,८६,२११ ३९३८.१४ ७७४५४.०७ 
पुणे ४१,१३९ २७,८४७ ६९३. ६७ ७७२६.२६
सोलापूर २,९७,४३२ २,६४,३५७ १७१८.९४ ५६००१.०४
एकूण ७,५७,०३३ ५,७८,४१६ ६३५०.७५ १४११८१.३७ 

 


इतर बातम्या
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...