जायकवाडीचे पाणी विष्णुपुरीत

जायकवाडीचे पाणी विष्णुपुरीत
जायकवाडीचे पाणी विष्णुपुरीत

नांदेड : जायकवाडी धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी सोमवारी (ता. २६) सायंकाळी सहाच्या सुमारास येथील गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पांच्या जलाशयामध्ये पोचले आहे. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पांत मंगळवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत २७.७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला. गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ‘टेल टू हेड’ या पद्धतीने पाणीसाठा जमा करण्यात येणार आहे, असे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विष्णुपुरी प्रकल्पात सोमवारी सकाळी २१.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. डिग्रस (ता. पालम) येथील उच्च पातळी बंधाऱ्यांतून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे सोमवारी सायंकाळी सहा वाजता विष्णुपुरी प्रकल्पामध्ये जायकवाडीचे पाणी पोचले. त्यात ४२ दलघमी एवढा पाणीसाठा जमा झाल्यानंतर डिग्रस बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येईल. त्यानंतर डिग्रस येथील बंधारा भरून घेतला जाईल. तसेच त्यावरील मुद्गल, ढालेगाव या ठिकाणच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा जमा करण्यात येईल. मुळी येथील बंधाऱ्याचे दरवाजे निकामी झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होणार नाही.

जायकवाडी धरणातून जलविद्युत केंद्र, तसेच दरवाजांतून नदीपात्रात एकूण ५ हजार ७८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजव्या कालव्याद्वारे ९०० क्युसेक, तर डाव्या कालव्याद्वारे १ हजार ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक बंद आहे. नदीपात्रात तसेच कालव्याद्वारे विसर्ग सुरू असल्याने मंगळवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंत जायकवाडीतील पाणीसाठ्यात ८६.४९ टक्क्यांपर्यंत घट झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com