agriculture news in marahi, sales center starts in rahuri, nagar, maharashtra | Agrowon

राहुरी कृषी विद्यापीठाची उत्पादने मिळणार आता एकाच दालनात
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नगर :  महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत करण्यात येणारी उत्पादने आता एकाच दालनात उपलब्ध होत आहेत. विद्यापीठाने नुकतेच विक्री केंद्र सुरू केले असून, कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांच्या हस्ते केंद्राचे उद्‍घाटन झाले आहे. 

नगर :  महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत करण्यात येणारी उत्पादने आता एकाच दालनात उपलब्ध होत आहेत. विद्यापीठाने नुकतेच विक्री केंद्र सुरू केले असून, कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांच्या हस्ते केंद्राचे उद्‍घाटन झाले आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची १९६८ मध्ये स्थापना झाली. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. राज्यातील विविध पिकांशी निगडित समस्यांवर संशोधन करण्यासाठी २७ संशोधन केंद्रे व प्रकल्पामध्ये संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनातून विद्यापीठाने आजवर विविध पिकांचे अधिक उत्पादने देणारे तसेच कीड व रोग प्रतिकारक असे २६३ सुधारित व संकरित वाण विकसित केले आहेत. याबरोबरच विद्यापीठाने विविध प्रकारची ३६ सुधारित यंत्रे व अवजारे विकसित केली आहेत. विद्यापीठ शेतकरीभिमुख संशोधन करत असून, विविध उत्पादनाची निर्मिती केली जाते. त्या उत्पादनांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी असते.

विद्यापीठाची उत्पादने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित विभागात जावे लागत असे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाया जात होता. त्यामुळे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा आणि संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दहाही जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात विक्री केंद्रे सुरू केली आहेत. त्यात विविध पिकांच्या वाणांचे बियाणे, कलमे रोपे, जैविक खते, जैविक कीडनाशके, प्रक्रिया पदार्थ आणि बेकरी उत्पादने, विद्यापीठ प्रकाशने, बांबू हस्तकला उत्पादने, कृषी यंत्रे व अवजारे आदी बाबी उपलब्ध होणार आहेत.

राहुरीला महात्मा फुले कृषी विद्यापीठात हे विक्री केंद्र राज्यमार्गा लगतच सुरू केले आहे. याशिवाय कार्यक्षेत्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या दहा जिल्ह्यांतील २७ संशोधन केंद्रांवर विद्यापीठ उत्पादने विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. उत्पादने गावपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी विपणन साखळी निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर डॉ. पी. एस. बेल्हेकर यांची विपणन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या मदतीला दोन विक्री प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येत आहे. शेतकरी गट, खासगी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विद्यापीठ उत्पादने खरेदी केल्यास साधारण खरेदी रकमेवर वीस टक्के सवलत देण्यात येत आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सात या कालवधीत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...