agriculture news in mararthi Build a 500-bed Kovid Hospital in Akola Central state minister Sanjay Dhotre | Page 2 ||| Agrowon

अकोल्यात ५०० बेडचे कोविड हॉस्पिटल उभारा ः धोत्रे

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

अकोला : शहर व जिल्ह्यातील कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शुक्रवारी (ता.१६) जिल्ह्यातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.

अकोला : शहर व जिल्ह्यातील कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शुक्रवारी (ता.१६) जिल्ह्यातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. अकोला जिल्ह्यात अकोला, बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यातील रुग्ण येत असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पुरेशा उपायोजनात व भविष्यात येणाऱ्या अडचणींबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली.

अकोल्यासह पश्‍चिम विदर्भात येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन तसेच केंद्र व राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली. अकोला शहरावर चार जिल्ह्यांचा भार येत असल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्षेत्रात पाचशे बेडचे अस्थायी मेगा कोविड हॉस्पिटल संदर्भात उपाय योजना, ऑक्सिजन तसेच इतरही आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी सुद्धा धोत्रे यांनी संपर्क साधला. 

नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा
वेळ पडल्यास युद्धस्तरावर उभारणी करण्याची तयारी करण्यासाठी अकोलेकरांनी सुद्धा प्रशासनाला साथ द्यावी. घराच्या बाहेर पडू नका. ही साखळी तोडण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून आपल्या परिवाराचे, समाजाचे रक्षण करणे आपले कर्तव्य समजावे. सरकारलाच दोष न देता आपले कर्तव्य म्हणून घराबाहेर पडू नका. आजारी असल्यास त्वरित उपचार घ्या, शारीरिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करा असे आवाहनही धोत्रे यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...