agriculture news in marath... But farmers is farm quarantine | Agrowon

...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !

ज्ञानदेव मासाळ
रविवार, 5 एप्रिल 2020

शहरातून गावाकडे परतलेल्या सर्वांना प्रतिबंधात्मक म्हणून शासनाने 'होम क्वाॅरंटाइन' केले आहे. कुणीही दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडायचे नाही, अन्यथा पोलिसांचा दंडुका आपल्या स्वागताला आहे. या सगळ्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' आहे.

सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. व्यवहार ठप्प आहेत. परदेशातून तसेच देशातील महत्त्वाच्या शहरातून गावाकडे परतलेल्या सर्वांना प्रतिबंधात्मक म्हणून शासनाने 'होम क्वाॅरंटाइन' केले आहे. कुणीही दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडायचे नाही, अन्यथा पोलिसांचा दंडुका आपल्या स्वागताला आहे. या सगळ्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' आहे. तो शेतात जाऊन एकट्याने संपणारी सर्व कामे संपवतोय. त्याचा दिवस शेतात खपतोय. त्याच्या समोरच्या प्रश्नांची जंत्री खूप मोठी आहे. 

लॉकडाऊनमुळे आवश्यकतेनुसार शेतमजूर मिळत नाहीत. मळणी मशीन, हळद शिजवण्यासाठी कुकर, इतर कामांसाठी यांत्रिक उपकरणे गरजेनुसार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तो आणखी चिंताग्रस्त आहे. दुधाची मागणी नेहमीप्रमाणे नसल्याने गावातील छोटे -छोटे डेअरी व्यावसायिक, गवळी यांनी शेतकऱ्यांकडून दूध घेणे काही प्रमाणात कमी केले आहे. शाळू, हरभरा, गहू पिकांची मळणी अर्धवट स्थितीत आहे. अजूनही सुमारे २० ते २५ टक्के द्राक्ष क्षेत्र काढणीच्या टप्प्यात आहे. मात्र व्यापारी नाही आणि जरी असलाच तरी दर पाडून मागतो आहे. कोथिंबीर, मेथी, दोडका, वांगी, शेवगा, भोपळा, पालक अशी भाजीपाला वर्गीय पिके योग्य वेळेत बाजारात न गेल्याने खराब होत आहेत. कलिंगड, पेरू या फळ पिकांचा हंगाम जिल्हाभर जोरात आहे. मात्र मालाची अवस्था शेतात सडून जातील की काय अशी स्थिती आहे. 

दबक्या आवाजात शेतकरी कोरोनाची माहिती घेतोय. मात्र त्याबरोबरच तो हे कधी थांबेल? वाहन कधी सुरू होतील? अशी माहिती घेतोय मात्र लॉकडाऊन पंधरा मार्चपर्यंत असल्याने त्याच्या चिंतेत भर पडतेय. संचारबंदी मुळे शेतातल्या फेऱ्या थोड्या कमी झाल्यात इतकेच. समोरची अर्धवट स्थितीतील कामे पाहून, होणारे नुकसान पाहून त्याच्या पोटात कालवाकालव होत आहे.  तरीही संचारबंदी पाळतोय. मात्र, अडचणींचा डोंगर मोठा असल्याने त्याची अस्वस्थता ही खूप मोठी आहे. शेळ्यामेंढ्या पाळणारे पशुपालक जनावरांना घेऊन चारावयास नेत आहेत.  त्यांची अडचण वेगळीच आहे. या जनावरांचे बाजार ठप्प आहेत त्यामुळे महिन्यातून एखादे शेळीमेंढीचे कोकरू विकून आपला विकून आपला उदरनिर्वाह चालवणारे हे पशुपालक धास्तीत आहेत. 

प्रतिक्रिया...

  • कोरोना लवकर जावा यासाठी ते देवाकडे प्रार्थना करत आहेत.
    - शहाजी झुरे, ढालगाव, ता. कवठेमहांकाळ जि. सांगली
     
  • कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले आहेत. ज्वारीची काढणी बाकी आहे. काहींचा कडबा रचून ठेवायचा बाकी आहे. उन्हाळी पाऊस समोर दिसू लागला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती आहे. डाळिंब छाटणीसाठी दहा ते बारा मजुरांची आवश्यकता असते मात्र संचारबंदी मुळे मजूर एकत्र येण्यास तयार नाहीत. शेतातील गहू,शाळू काढणी करून शेतात काढून टाकला. मजूर शेतात येईनात, गाळणी मशीन डिझेल अभावी बंद अवस्थेत आहे. मध्यंतरी पडलेल्या अवकाळीमुळे गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. गहू,शाळू कापणी करून सरीतच पडला आहे. पेट्रोल पंप बंदीमुळे गाळणी मशीन बंद आहेत. त्यामुळे गहू, शाळू खराब होऊन शेतात उगवतो की काय अशी स्थिती सध्या आहे.त्यामुळे आम्हांला शेतात क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. भाजीपाला विक्री अभावी शेतात सडत आहे.
    - अमोल भोसले, शेतकरी देवीखिंडी, ता. खानापूर, जि सांगली

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...