Agriculture news in marath, Hundreds of families in Lakhegaon, homegrown, nutrient based farming | Agrowon

लाखेगावात शंभर कुटुंबांत परसबाग, पोषणमूल्य आधारित शेती
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : पैठण रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्रातर्फे पोषण परसबाग व पोषणमूल्य आधारित शेतीपद्धती प्रकल्प लाखेगाव येथील १०० कुटुंबांत राबविण्यात येणार आहे. नारी व युनिसेफअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर होणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत परसबाग व पोषणमूल्य आधारित शेती केली जाणार आहे. त्यासाठी जुलै महिन्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातर्फे देण्यात आली.

औरंगाबाद : पैठण रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्रातर्फे पोषण परसबाग व पोषणमूल्य आधारित शेतीपद्धती प्रकल्प लाखेगाव येथील १०० कुटुंबांत राबविण्यात येणार आहे. नारी व युनिसेफअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर होणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत परसबाग व पोषणमूल्य आधारित शेती केली जाणार आहे. त्यासाठी जुलै महिन्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातर्फे देण्यात आली.

‘‘लाखेगाव येथील १०० कुटुंबांना ज्वारी (शक्ती-लोहयुक्त वाण) लोहयुक्त बाजरी, राडा, भगर, राजगीर शेवगा, लिंबू व १८ प्रकारचे विविध भाजीपाल्याचे बियाणे देण्यात आले. अटारी पुणे, महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद, पुणे यांच्या सहयोगाने एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली युनिसेफच्या अर्थसाहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याद्वारे विषमुक्त अन्न व भाजीपाल्याची निर्मिती होईल,’’ असे ‘केव्हीके’च्या शास्त्रज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर यांनी सांगितले. 

‘केव्हीके’च्या प्रमुख प्रा. दीप्ती पाडगावकर म्हणाल्या, ‘‘ग्रामीण भागात सर्व लोक हे शेतीशी निगडित आहेत; परंतु त्यांच्या कष्टाच्या मानाने आहारात पोषक घटकांची कमतरता अधिक आहे. लहान मुले व महिलांच्या बाबतीत हे प्रमाण दुप्पट आहे. त्यामुळे अनेक आरोग्यविषयक तक्रारी निर्माण झाल्याचे आढळून येत आहे.’’ 

‘‘सेंद्रिय पद्धतीने पोषण परसबाग संकल्पना ग्रामीण भागात रुजावी, आरोग्यसाठी भाजीपाला व अन्यधान्य शेतकरी कुटुंबांत उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे,’’ असेही पाडगावकर यांनी सांगितले. इरफान शेख, सरपंच अंकुश रहाटवडे, निवृत्ती कागदे आदींचा विशेष सहयोग लाभला.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...