Agriculture news in Marath Lift paddy at the guarantee center | Agrowon

हमीभाव केंद्रावरील धानाची उचल करा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 मार्च 2020

गडचिरोली ः हमीभाव केंद्रावर धान साठवणुकीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे धान केंद्रावरील धानाची उचल करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या शिष्टमंडळाने केली आहे. 

गडचिरोली ः हमीभाव केंद्रावर धान साठवणुकीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे धान केंद्रावरील धानाची उचल करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या शिष्टमंडळाने केली आहे. 

आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राजुरकर यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात कुरखेडा आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे उपसभापती चांगदेव फाये, आंधळीचे उपसभापती विनोद खुणे, व्यवस्थापक हेमंत शेंदरे, संघटनेचे सचिव माधव तलमले, महेंद्र मेश्राम, सुधाकर वैरागडे, लिलाधर घोसेकर, नरेंद्र पटणे, व्यवस्थापक वसंता हटवार सुभाष बोरकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. 

हमीभाव व त्याच्या जोडीला सानुग्रह अनुदान यामुळे शासकीय धान खरेदीचे दर २५०० रुपयांवर पोचले आहेत. त्यामुळे धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर गर्दी केली आहे. संस्थांकडे असलेले गोदाम व काही ठिकाणी असलेले ओटे पूर्णतः भरलेले आहेत. धान साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नाही. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडील धान खरेदी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे धान नाइलाजाने उघड्यावरच ठेवावे लागले.

खरेदी केलेले धानही उघड्यावरच साठविण्यात आले आहे. अशातच अवकाळी पाऊस झाल्यास मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. हे धान झाकण्यासाठी ताडपत्रीची गरज राहते. त्याची मागणी करूनही पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी पावसामुळे धान खराब होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

शासन निर्णयानुसार, दोन महिन्यांच्या आत धान उचल करण्याची जबाबदारी महामंडळाची आहे. मात्र, खरेदीनंतर तीन ते चार महिन्यांचा कालावधी होऊनही खरेदी केलेले धान मोठ्या प्रमाणावर केंद्रावर पडून आहे. भविष्यात पावसामुळे धान खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला आविका संस्था जबाबदार राहणार नाही. त्यामुळे धान उचल करण्याची मागणी करण्यात आली.


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...