Sangli district receives Rs 34 crore aid for crop damage
Sangli district receives Rs 34 crore aid for crop damage

सांगली जिल्ह्याला ३४ कोटींचा निधी प्राप्त

सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे पूर्ण करून संबंधित विभागाकडे सादर केले होते. राज्यपालांच्या आदेशानंतर नुकसानीच्या मदतीला तातडीने सुरुवात झाली असून, सांगली जिल्ह्यासाठी पहिला हप्ता ३४ कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. १ लाख ७० हजार शेतकऱ्यांचे १ लाख ४ हजार ४४१ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तासगाव तालुक्‍यातील सर्वाधिक ६८ हजार ७४२ शेतकऱ्यांचे ४३ हजार ८२२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळिंब, खरिपाच्या पिकांसह भाजीपाल्याच्या नुकसानीचा यामध्ये समावेश आहे. पिकांच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने १६ नोव्हेंबरलाच शासनाला सादर केला होता. प्रशासनाने नुकसानीपोटी ११६.७७ कोटींचा निधीची गरज असल्याचे सरकारला कळविले आहे. त्यात सुधारित निकषानुसार वाढ होऊ शकते. 

परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंबासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ११७ कोटींची हानी झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याबाबत शेतकऱ्यांसह सर्वच स्तरांतून मागणी झाल्यानंतर शासनाने भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पिकांचे पंचनामा करण्यात आले. याच कालावधीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्यपालांनी तातडीने मदतीची घोषणा केली अन्‌ त्याची अंमलबजावणीही होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com