दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
ऊसदर आंदोलनाची रणभूमी कऱ्हाड राहील
उसदर आंदोलन टाळायचे असेल, तर मंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील कारखान्यांना एफआरपी जाहीर करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली.
सातारा : ऊसदरासह इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ५ डिसेंबरला बैठक होणार आहे. बैठकीत ‘एफआरपी’ व इतर मुद्द्यांवर तोडगा न निघाल्यास त्यानंतर होणाऱ्या आंदोलनाची रणभूमी कऱ्हाड राहणार आहे. आंदोलनाची तीव्रता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. आंदोलन टाळायचे असेल, तर मंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील कारखान्यांना एफआरपी जाहीर करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा ते कऱ्हाड पायी आक्रोश मोर्चाचे सोमवारी (ता. २३) आयोजन करण्यात आले होते. हे आंदोलन जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून शेट्टी यांनी स्थगित केले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ``कोरोना व इतर कारणांमुळे यंदाच्या ऊस परिषदेत आम्ही सबुरीचे धोरण घेतले.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व कारखान्यांची एफआरपी जाहीर केली. साताऱ्यातील कारखानदार त्याबाबत गप्प आहेत. सहकारमंत्री जिल्ह्यातील आहेत. त्यांनी पुढाकार घेत कारखान्यांना तसे आदेश देणे आवश्यक होते. मात्र ते सुद्धा गप्प आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ५ डिसेंबर रोजी बैठक आयोजिल्याचे लेखी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.``
- 1 of 1023
- ››