अडीच हजार शेतकऱ्यांनी  नाकारला यांत्रिकीकरण लाभ

शेतकऱ्यांना अनुदानावर अवजाराचा लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेसह अन्य योजनांसाठी ‘महाडीबीटी’वर शेतकऱ्यांनी अर्ज केले.
Two and a half thousand farmers Rejected mechanization benefits
Two and a half thousand farmers Rejected mechanization benefits

 नगर : शेतकऱ्यांना अनुदानावर अवजाराचा लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेसह अन्य योजनांसाठी ‘महाडीबीटी’वर शेतकऱ्यांनी अर्ज केले. मात्र २०२१-२२ या वर्षासाठी निवड झालेल्या ३ हजार ५७४ शेतकऱ्यांपैकी गरज नसलेल्या बाबीसाठी निवड झाल्याने आतापर्यंत नगर जिल्ह्यात २ हजार ४८३ शेतकऱ्यांनी निवड होऊनही लाभ नाकारला आहे. त्यात वेळेत निवड होऊनही लाभ घेतला नसल्याने ६२ शेतकऱ्यांची नावे कृषी विभागाने रद्द केली आहेत. शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण उपअभियान योजना राबवली जाते. त्यातून ट्रॅक्टर, पॉवर टिलर व गळीत धान्य योजनेतून इतर औजारासह कापूस विकास योजनेतून कापूस झाडांसाठी कुट्टी मशिन, फलोत्पादनमधून पॉवर टिलर, ऊस विकास योजनेतून पाचट कुट्टी, भरडधान्यातून मका सोलणी यंत्र, कडधान्यातून दाळमील अशा यंत्राचा लाभ दिला जातो.  शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ‘अर्ज एक लाभ अनेक’मधून एकाच वेळी अनेक अवजारे लाभासाठी अर्ज करण्याची शासनाने सोय केली आणि मागणी अर्जाचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू झाला. २०२०-२१ वर्षासाठी राज्यात १२ लाख ८१ हजार हजार तर नगर जिल्ह्यात १ लाख ९५ हजार ८० अर्ज आलेले आहेत. त्यात केवळ ट्रॅक्टरचा लाभ मिळावा यासाठी ६७ हजार अर्ज आहेत. राज्यात आतापर्यंत सुमारे ४ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहे. ट्रॅक्टरसाठी अनुदान दिलेल्या शेतकऱ्यांची यादी अजून जाहीर केले नसली तरी मागणीच्या तुलनेत निवडलेले लाभार्थी नगरसह राज्यात अल्प आहेत.  नगर जिल्ह्यातील मागणी केलेल्या १ लाख ९५ हजार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ ३५७४ शेतकऱ्यांची अनुदानासाठी सोडतीतून निवड केली आहे. निवड होऊनही शेतकरी लाभ घेत नसल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधिताकडे पाठपरावा करावा लागत होता. त्यामुळे यंदापासून वेळेत योजनेचा लाभ घेतला नाही तर लाभ रद्द केला जाऊ लागला. त्यानुसार नगर जिल्ह्यात आतापर्यंत ६२ शेतकऱ्यांचा लाभ रद्द केला आहे. शिवाय नको असल्याच महाडीबीटी पोर्टलवरही रद्दचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मागणी एकाची आणि अनुदानासाठी दुसऱ्याच बाबीची निवड झाली असल्याने नगर जिल्ह्यातील २ हजार ४२१ शेतकऱ्यांनी लाभ नाकारला आहे. आतापर्यंत केवळ दीड वर्षांत ३०० शेतकऱ्यांना २ कोटी २४ लाख रुपये अनुदान दिले आहे, तर निवडलेल्या १०१९ शेतकऱ्यांना देण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सांगण्यात आले.

पोर्टलवर लाखावर मागणी अर्ज  यंदासाठी राज्यात १ लाख ११ हजार अर्ज शेती अवजारासह कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर मागणी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. यंदा (२०२१-२२) आतापर्यंत राज्यातून १ लाख ११ हजार ३१५ अर्जाची नोंदणी झाली आहे. त्यात ३९ हजार ३९० अर्ज केवळ ट्रॅक्टरच्या मागणीसाठी आहेत. नगर जिल्ह्यातही आतापर्यंत एकूण ९ हजार ५०६ अर्ज आले असून, त्यात ३ हजार ५३८ शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची मागणी केली आहे. यंदासाठी अजून सोडत काढण्याबाबत काहीही हालचाली नाहीत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com