सोलापूर जिल्ह्यात खरिपात शेतकऱ्यांना १ हजार कोटींचे कर्जवाटप

खरिपात शेतकऱ्यांना १ हजार कोटींचे कर्जवाटप
खरिपात शेतकऱ्यांना १ हजार कोटींचे कर्जवाटप

सोलापूर  : वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ५० हजार ५५० शेतकऱ्यांना एक हजार ३८६ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ८१ हजार ४९७ शेतकऱ्यांना एक हजार ३७ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा झाला आहे. उद्दिष्टाच्या ७४.७९ टक्के कर्जवाटप यंदा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाटपाची आकडेवारी वाढली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने २५ हजार ७२३ शेतकऱ्यांना १८३ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. बॅंक ऑफ इंडियाने २२ हजार २१५ शेतकऱ्यांना २८५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.

आयसीआयसीआय बॅंकेने आठ हजार ९१३ शेतकऱ्यांना १०९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. खरिपाच्या कर्ज वाटपात या तीन बॅंका आघाडीवर आहेत. युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, कॅनरा बॅंक, सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांनी शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज वाटपात निराशाजनक कामगिरी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com