ज्वारीचा पीकपद्धतीत समावेश आवश्‍यक : धोत्रे

ज्वारीचा पीकपद्धतीत समावेश आवश्‍यक : धोत्रे
ज्वारीचा पीकपद्धतीत समावेश आवश्‍यक : धोत्रे

अकोला : ‘‘पारंपरिक शेतीमध्ये महत्त्वाचा व शाश्वत घटकात ज्वारी या पिकाचा समावेश होता. त्या पिकाचा सध्याच्या पीकपद्धतीमध्ये समावेश होणे, हे कोरडवाहू शेतीसाठी आवश्यक आहे,’’ असे मत खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी आणि ‘राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा’निमित्त सिसा (उदेगाव) येथे ‘रब्बी ज्वारी शेती दिन’ कार्यक्रम घेण्यात अाला. विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रातर्फे त्याचे आयोजन झाले. उद्‍घाटक म्हणून धोत्रे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. बी. वडतकर, प्रवीण सावरकर, वरिष्ठ संशोधक (ज्वारी) डॉ. आर. बी. घोराडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. यू. जी. ठाकरे उपस्थित होते.  

धोत्रे म्हणाले,  आधुनिक शेतीच्या नावाखाली, अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी आपण शेतीच्या व स्वताच्या आरोग्याशी खेळत आहोत. त्यामुळे आपण विविध समस्या निर्माण केल्या आहेत. आता पारंपरिक पीकपद्धतीतीस आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन समस्याचे संधींमध्ये रूपांतरण करावे.’’

सुरवातीला पीकेव्ही- क्रांती या वाणाची पाहणी करण्यात आली. हा वाण ठोकळ व चमकदार मोत्यासारख्या दाण्यामुळे, कीड व रोग प्रतिकारक क्षमता, कडब्याची गुणवत्ता, घरचे बियाणे घरी वापरता येत असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस पडला. डॉ. घोराडे यांनी तृणधान्यामधील पौष्टिक घटक, ज्वारी लागवड तंत्रज्ञान, ज्वारीचे विविध वाण, पीकेव्ही क्रांती या वाणाची वैशिष्ट्ये, खरीप व रब्बी हंगामांत ज्वारी पिकाच्या समावेशाचे महत्त्व सांगितले.

डॉ. भाले म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी बाजारात जे विकते ते पिकवावे. ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढवावे. दुग्ध व्यवस्थापन, शेती अनुरूप जोडधंधा करा.’’ डॉ. कुलदीप देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. व्ही. व्ही. काळपांडे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com