Agriculture news in marathi नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी, यासाठी शासनाने ''महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती'' योजनेच्या रूपाने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन् | Agrowon

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द : भुजबळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी, यासाठी शासनाने ''महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती'' योजनेच्या रूपाने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी, यासाठी शासनाने ''महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती'' योजनेच्या रूपाने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरिक्षक छोरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, महाराष्ट्र प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.
 
या वेळी श्री. भुजबळ म्हणाले, कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कमी वेळेत कार्यवाही पूर्ण केली असून जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीयस्तरावर ''मुख्यमंत्री सचिवालय कक्ष'' कार्यान्वित करण्यात आला. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण विभाग पातळीवर कमी वेळात होणार आहे. त्याचप्रमाणे सेवा हमी कायद्यामधील पूर्वीच्या २० व नव्याने देण्यात येणाऱ्या ८१ सेवा मिळून सेवांची शंभरी गाठणारा नाशिक हा राज्यातील प्रथम व एकमात्र जिल्हा असल्याचे त्यांनी या वेळी नमूद करून पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनदंन केले. 


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...