बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयोग

शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करताना कमी खर्चात अधिकचे दोन पैसे मिळविल्याशिवाय शेतकरी, मजुरांसह वाहनचालकांना पर्याय उरला नाही, त्या उद्देशाने वाहनांमध्ये विकसित झालेली नवनवीन टेक्नॉलॉजी स्वीकारताना आता ग्रामीण भागही पुढे येऊ पाहत आहे.
Twelve quintals 35 kg of soybean harvested per hectare
Twelve quintals 35 kg of soybean harvested per hectare

माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करताना कमी खर्चात अधिकचे दोन पैसे मिळविल्याशिवाय शेतकरी, मजुरांसह वाहनचालकांना पर्याय उरला नाही, त्या उद्देशाने वाहनांमध्ये विकसित झालेली नवनवीन टेक्नॉलॉजी स्वीकारताना आता ग्रामीण भागही पुढे येऊ पाहत आहे. त्याचे उत्तम उदाहरण सध्या माळेगाव साखर कारखान्यावर पाहावयास मिळत आहे. कारखाना प्रशासनाने ऊस वाहतूक खर्चात बचत होण्याच्या पार्श्‍वभूमीवर ट्रॅक्टर सीएनजी कीट बसवून वाहतूकदार यांच्या खर्चात बचत करण्याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग केला आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर कारखाना आणि वाहतूकदार या दोघांसाठी हा पर्याय क्रांतिकारक ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नुकतीच या ट्रॅक्टरची पाहणी केली. 

व्हीएसआय मांजरी येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै रोजी अॅग्रिकल्चर सॉलिड वेस्ट व इंडस्ट्रिअल सॉलिड वेस्ट यांच्यापासून साखर कारखाना स्तरावर बायो -सीएनजी उत्पादन मिळविण्याकरिता वेबिनार झाला होता. त्यामध्ये बायो - सीएनजी प्रकल्प उभारण्याकरिता संबंधित कंपन्यांनी सहभागी कारखानदार प्रतिनिधींना सदर प्रकल्पाची तांत्रिक माहितीचे सादरीकरण करण्यात आले होते. 

त्या पार्श्‍वभूमीवर माळेगाव सहकारी संचालक मंडळाने डिस्टिलरी बायोगॅसपासून बायो -सीएनजी प्रकल्प उभारण्याची मानसिकता केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर कारखाना प्रशासनाने प्रत्येक गटातील एका सभासद वाहतूकदारांच्या ट्रॅक्टरला मोफत बायो- सीएनजी कीट (रेट्रो फिटमेन्ट किट) बसविण्याचे निश्‍चित केले आहे. त्यानुसार पहिले किट पणदरे येथील ऊस वाहतूकदार शहाजी लकडे यांच्या ट्रॅक्टरला बसविण्यात आले आहे. 

या प्रयोगाची पाहणी सोमवारी (ता. ६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात केली. या वेळी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सिलाल आटोळे संचालक नितीन सातव, अनिल तावरे, योगेश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते. सहा गटांतील सहा ट्रॅक्टरवर केलेला हा प्रयोग यशस्वी होताच कारखाना स्वतः बायो-सीएनजी गॅसची निर्मिती करणार आहे.

ट्रॅक्टर सीएनजी किटची माहिती ट्रॅक्टर सीएनजी किटला ड्यूअल फ्यूएल सिस्टिम आहे. सीएनजी किटची मूळ किमत रु. १.३२ लाख आहे. सदर ट्रॅक्टर पूर्ण क्षमतेने (लोडवर - २५ टन) डिझेलवर ३.५ किलोमीटर मायलेज देतो आणि सीएनजी किट बसविल्यानंतर ४.५ ते ५ किलोमीटर मायलेज देते. सीएनजी टॅंक वॉटर कॅपॅसिटी ६० लिटर असून, त्यामध्ये १० किलो सीएनजी बसतो. सदर किट डिझेल व सीएनजी रेशो ३० टक्के डिझेल व ७० टक्के सीएनजी राहील. सदर किटमुळे इंधन (३५ ते ४० टक्के इंधन) बचत होईल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. सदर किटमुळे शेतकरी सभासद व वाहतूकदार यांच्या खर्चात बचत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com